अशोक पवार, रमेश मोरे यांची प्रतिक्रिया कोल्हापूर :कोल्हापुरकरांचा नाद नाय करायचा, हे तुम्ही अनेकदा ऐकलं, वाचलं आणि कदाचित अनुभवलंही असेल. आपल्या अशाच लहरी, नादखुळ्या स्वभावाची चुणूक कोल्हापुरकर तरुणांनी पुन्हा एकदा दाखवली. लग्न करण्यासाठी मुलगी द्या, मटण स्वस्त करा, कोल्हापुरात समुद्र पाहिजे अशा अजब-गजब मागण्यांसाठी आज कोल्हापुरात सायकल रॅली काढण्यात आली. कोल्हापुरातील या रॅलीची सध्या राज्यभर चांगलीच चर्चा रंगलीय. कोल्हापुरातील खासबाग मैदानाजवळील प्रिन्स क्लबच्या सदस्यांनी या सायकल रॅलीचं आयोजन केलं होतं. पंचगंगा नदीचा संगम असलेल्या करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली या गावापर्यंत रॅली काढून समाजाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळं या रॅलीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
पेट्रोल फुकट मिळालंच पाहिजे :कोल्हापूर आंदोलनाचं शहर म्हणून ओळखलं जातं. या कोल्हापुरात अनेक आंदोलन झालेत. या आंदोलनामुळं केंद्र सरकारला देखील दखल घेण्यास कोल्हापुरकरांनी भाग पाडलंय. मात्र, याच कोल्हापुरात कधी-कधी अशी हटके आंदोलन होतात जी देशभर गाजतात. त्याच कोल्हापुरात सोमवारी एक अशी गमतीशीर सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये सायकलला लावण्यात आलेल्या फलकांवर लग्नासाठी पोरगी मिळालीच पाहिजे, कोल्हापुरात समुद्र झालाच पाहिजे, मटण स्वस्त झालंच पाहिजे, पेट्रोल फुकट मिळालंच पाहिजे अशा अनेक मजेदार मागण्या करण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी सायकलचा वापर करा : या वेळी आंदोलकांनी पंचगंगा नदीच्या संगमावरती अभिनेत्री माधुरी दीक्षितचा फोटो लावत सायकलचं पूजन करून रॅलीची सुरुवात कली. एकीकडं मजेदार फलक असणाऱ्या या सायकल रॅलीचा उद्देश, मात्र सर्वांच्या फायद्याचाच होता, यात नागरिकांनी सायकलचा वापर करून प्रदूषण टाळलं पाहिजे, आपलं आरोग्यसुद्धा जपलं पाहिजे, असा संदेस देण्यात आला आहे. त्यामुळं कोल्हापुरातील नागरिकांमध्ये या रॅलीचीच चांगली चर्चा रंगली होती.
मुलींनी कर्तृत्व बघावे, प्रॉपर्टी बघू नये :लग्नासाठी मुलाचं कर्तृत्व चांगलं असंल तरी, मुलींमध्ये मुलाच्या मालमत्तेकडं पाहण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. मात्र, मुलींनी मालमत्तेकडं न पहाता मुलाचं कर्तृत्व पाहावं, तो व्यासनाधीन नसावा, त्याची वागणूक चांगली असायला हवी, अशा बाबी बघायला हव्यात. केंद्रासह राज्य सरकारनं अनेक खात्यांचं खाजगीकरण केलंय, त्यामुळं सरकारी नोकऱ्यांची अवस्था गंभीर झाली आहे, निदान आता तरी लग्न करू इच्छिणाऱ्यांनी नोकरीचा हट्ट सोडावा, अशी मागणी विवाहित मुलांनीही केली आहे.
हे वाचलंत का :
- साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीसाठी 53 उमेदवार रिंगणात, कोणतं पॅनल जिंकणार?
- तहसीलदार कार्यालयातून चोरली ईव्हीएम मशीन; पाहा सीसीटीव्ही
- युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांची पोलीस कोठडीत तब्येत बिघडली, रुग्णालयात केलं दाखल