मुंबईGold Purchase In Mumbai :अर्थमंत्र्यांनी सोने-चांदीवरील सीमा शुल्कात कपात केल्याची घोषणा केल्यानंतर सोने-चांदीच्या दरात घसरण झाल्यामुळे खरेदीदारांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे अनेक ग्राहक सोन्याच्या दराची फोन करून चौकशी करत आहेत. ग्राहकवर्ग काल दुपारपासूनच सोनं-चांदी खरेदीसाठी बाजारामध्ये गर्दी करत असल्याचं गुलाब ज्वेलर्सचे मालक श्रेयांश जैन यांनी सांगितलं. मुंबईत सोनं प्रति तोळा 3007 रुपये तर चांदी प्रति किलो 3157 रुपये कमी झाली आहे तर प्लॅटिनम 2200 रुपये कमी झालं आहे.
सोन्याच्या तस्करीला आळा बसेल - कुमार जैन :सोने-चांदीवरील 15% स्टॅम्प ड्युटी केंद्र सरकारं कमी केली. त्यामुळे ती 9 टक्क्यांवर आली आहे. याचा फायदा आपल्या सरकारला देखील होणार आहे; कारण यापूर्वी सोन्याची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात असल्यामुळे केंद्र सरकारला टॅक्स मिळत नव्हता. आता, अशा प्रकारे टॅक्स कमी केल्यामुळे सोनं तस्करीला देखील आळा बसेल. संपूर्ण देशात सोनं आणि चांदीचा भाव घसरला आहे. त्यामुळे याचा फायदा निश्चितच आमच्या ग्राहकांना झाला असून सराफा बाजारात आता पुन्हा चैतन्य निर्माण होईल असा विश्वास सोने-चांदी खरेदी विक्री मुंबई संघटनेचे अध्यक्ष कुमार जैन यांनी वर्तवला.सोन्या चांदीचे भाव कमी झाले ही आम्हा गृहिणींसाठी फारच आनंदाची गोष्ट आहे; कारण एक म्हणजे स्त्रीधन म्हणून सोन्या-चांदीचे फार महत्त्व आहे. एक आपल्या हक्काचं सेविंग म्हणून सोन्या-चांदीकडे आम्ही पाहतो. आगामी काळात श्रावण सुरू होईल. सण, उत्सव येतील त्या काळात सोन्या-चांदीचे दागिने भेट म्हणून दिले जातात. त्यामुळे सोन्याला आणि चांदीला खूप महत्त्व आहे. अडचणीत याचा फायदा देखील आम्हा कुटुंबाला होत असतो. आम्हाला तर आनंद होत आहे; मात्र जेव्हा आम्ही सोनं खरेदी करतो त्यावेळी सांगितलं जातं की तुम्ही जेव्हा सोनं मोडण्यासाठी आणणार त्यावेळेस तुम्हाला कोणताही कर लावला जाणार नाही; मात्र काही विक्रेत्यांकडून घेतलेलं सोनं परत घेतेवेळी 10% कर वजा करून सोनं परत घेतलं जातं. यामुळे आमच्यासारख्या गृहिणींना खूप दुःख होत असतं. याचा देखील विचार केंद्र सरकारनं करावा. कमी झालेल्या किमतीचा फायदा आम्हा गृहिणी वर्गालाच होणार आहे. त्याच्यामुळे पंतप्रधान मोदी आणि मंत्री निर्मला सीतारमन यांचे आभार मानतोय. - सनिदा अजगावकर, गृहिणी