महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लाल कांदा बाजारात भरमसाठ ; मात्र टिकाऊ आणि आरोग्यवर्धक असल्यानं पांढऱ्या कांद्याला ग्राहकांची प्रचंड मागणी, जाणून घ्या कारण - CUSTOMER DEMANDS WHITE ONION

बाजारात लाल कांदा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र ग्राहक पांढऱ्या कांद्याला जास्त प्राधान्य देत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. पांढरा कांदा गुणवर्धक असल्याचं ग्राहक सांगतात.

Customer Demands White Onion
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 2, 2024, 11:26 AM IST

Updated : Dec 2, 2024, 12:11 PM IST

नाशिक : उन्हाळी पांढरा कांदा आणि लाल कांद्याचं उत्पादन नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होते. देशभरातील कांदा उत्पादनात नाशिक जिल्ह्यात 60 टक्के कांद्याचं पीक घेतलं जाते. ग्राहकांकडून लाल कांद्यापेक्षा उन्हाळी पांढऱ्या कांद्याला अधिक मागणी असते. ठिकाऊ आणि आरोग्यवर्धक असल्यानं उन्हाळी कांद्याला ग्राहक सर्वाधिक पसंती देतात.

देशातील कांद्याचं नाशिक प्रमुख केंद्र :देशातील कांद्याचं प्रमुख केंद्र म्हणून नाशिक जिल्ह्याला ओळखलं जाते. जिल्ह्यात चालू वर्षात खरीप कांद्याची लागवड 60 हजार 90.70 हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. यात सर्वाधिक कांदा लागवड चांदवड तालुक्यात झाली असून दुसऱ्या स्थानावर येवला तालुका आहे. साधारणपणे, हंगामातील कांद्याची लागवड जुलै-सप्टेंबरमध्ये होते. त्याची काढणी ऑक्टोबरच्या उत्तरार्धात सुरू होते आणि डिसेंबरपर्यंत चालू राहते. खरीप कांद्याची लागवड ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होते. काढणी जानेवारीमध्ये सुरू होते आणि मार्चच्या मध्यापर्यंत चालू राहते. नाशिकमधून सर्वाधिक कांदा मलेशिया, श्रीलंका, यूएई, बांगलादेश, कुवेत या देशासहप्रमुख दहा देशांमध्ये 92 टक्के कांद्याची निर्यात होते. एकूण मिळणाऱ्या परकीय चलनातून 91 टक्के चलन या दहा देशांकडून भारताला मिळत असते.

आरोग्यवर्धक असल्यानं पांढऱ्या कांद्याला ग्राहकांची प्रचंड मागणी (Reporter)

कांद्याचे नुकसान : ऑक्टोबर 2024 मध्ये नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील 21 हजार हेक्टरवरील कांद्याचं नुकसान झालं. त्यामुळे यंदा लाल कांदा हा उशिरानं बाजारात दाखल झाला. तसेच आवक कमी असल्यानं लाल कांद्याचे भाव किरकोळ बाजारात 60 ते 70 रुपये किलो आहेत. तर उन्हाळी कांदा हा 80 ते 90 रुपये किलोंना ग्राहकांना खरेदी करावा लागतो. पुढील पंधरा दिवस कांद्याचे भाव चढे राहतील, असं कृषी तज्ञांनी सांगितलं आहे.

कांद्याचे औषधी गुणधर्म : "लाल कांद्यापेक्षा उन्हाळी पांढऱ्या कांद्याला ग्राहकांची पसंती असते. उन्हाळ्यात कांदा खाणं अमृतापेक्षा कमी नाही. रोजच्या आहारात कांद्याचा समावेश करून आणि बाहेर जाताना कांदा सोबत ठेवल्यास उष्णतेचा प्रकोप टाळता येत असल्याचं तज्ज्ञ सांगतात. डोक्याला उष्णता जाणवत असल्यास केसांमध्ये कांद्याचा रस लावल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. कांद्याचा रस त्वचा आणि केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी देखील वापरला जातो. कांदा बारीक वाटून पाण्यात पाय ठेवून बसल्यास उष्णता आणि उष्माघात कमी होतो, अशी नागरिकांची धारणा आहे. कांद्याचा रस कानात टाकल्यानं कान दुखणं कमी होते," असं तज्ज्ञ सांगतात. "श्वसनाच्या आजारावर देखील कांदा खूप फायदेशीर आहे. सांधेदुखीच्या उपचारातही कांद्याचा उपयोग करण्यात येतो. कांद्यात अँटि ऑक्सिडंट्स भरपूर असतात आणि त्यात व्हिटॅमिन सी देखील असते, जे आजारापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त आहे. कांद्याचं नियमित सेवन केल्यानं शरीरातील अन्न पचन होण्यास मदत होते. कांदा शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाची समस्या असेल, तर त्यानं कच्चा कांदा खाल्ला पाहिजे. हृदयाशी संबंधित आजारांमध्येही कांद्याचं सेवन फायदेशीर ठरते." असं वैद्यकीय तज्ज्ञ दावा करतात.

हेही वाचा :

  1. केंद्रीय अर्थसंकल्प 2024 ; कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार का दिलासा? शेतकऱ्यांनी केली 'ही' मागणी - Budget 2024 Expectations
  2. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा 'कांद्याबाबत मोठा निर्णय' - Onion Export
  3. कांदा खाणं बंद केलं तर शरीरावर काय होऊ शकतो परिणाम? काय आहे आरोग्य तज्ञांचं मत? - Stop Eating Onion
Last Updated : Dec 2, 2024, 12:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details