महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधान परिषद आमदारांचा संपणार कार्यकाळ; 'हे' 21 आमदार होणार निवृत्त - विधान परिषद

Maharashtra Legislative Council : विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. त्यानंतर आता पुन्हा 21 आमदारांचा कार्यकाळ संपणार आहे.

Maharashtra Legislative Council
संग्रहित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 3, 2024, 10:36 AM IST

मुंबई Maharashtra Legislative Council : देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि महायुतीतील घटक पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहे. मात्र दुसरीकडं विधान परिषदेतील 21 आमदारांचा जुलै महिन्याच्या अखेरीस कार्यकाळ संपणार आहे. तर राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात कलगितुरा पाहायला मिळाला होता.

विधान परिषदेतील 21 आमदार होणार निवृत्त :राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा कायम असताना त्यात आता निवृत्त होणाऱ्या आमदारांची भर पडणार आहे. निवृत्त होणाऱ्या दहा आमदारांपैकी एक आमदार 31 मे, पाच आमदार 21 जून, तर चार आमदार 7 जुलै रोजी निवृत्त होणार आहेत. आगामी तीन महिन्यात अर्थात जुलै महिन्यापर्यंत टप्याटप्याने 21 विधान परिषद आमदार निवृत्त होतील. निवृत्त होणाऱ्या आमदारांमध्ये भाजपाचे आठ, ठाकरे गटाचे तीन, शिंदे शिवसेना तीन, काँग्रेस दोन, राष्ट्रवादी काँग्रेस दोन याशिवाय जनता दल, राष्ट्रीय समाज पक्ष, अपक्ष, आदी आमदारांचा समावेश आहे.

जुलै महिन्यात हे 11 आमदारांचा संपणार कार्यकाळ :विधानसभा सदस्यांमधून निवडून गेलेल्या आमदारांमध्ये मनीषा कायंदे, विजय गिरकर, बाबाजानी दुराणी, निलय नाईक, अनिल परब, रमेश पाटील, रामराव पाटील, डॉ. मिर्झा अथर, प्रज्ञा सातव, महादेव जानकर, जयंत पाटील हे सर्व 11 आमदार जुलै महिन्यातील 27 तारखेला निवृत्त होत आहेत. पदवीधर मतदार संघातून निवडून गेलेले विलास पोतनीस आणि निरंजन डावखरे. शिक्षक मतदार संघातून निवडून गेलेले किशोर दराडे आणि कपिल पाटील हे सात जुलै 2024 रोजी निवृत्त होणार आहेत. स्थानिक प्राधिकारी संस्थेच्या माध्यमातून निवडून आलेले अनिकेत तटकरे मेच्या 31 तारखेला तर नरेंद्र दराडे, रामदास आंबटकर, विप्लव बाजोरिया, प्रवीण पोटे-पाटील आणि सुरेश धस या आमदारांचा कार्यकाळ 21 जूनला संपत आहे.

या 21 आमदारांचा संपणार कार्यकाळ :अनिकेत तटकरे 2) नरेंद्र भिकाजी दराडे 3) रामदास आंबटकर 4) विप्लव बाजोरिया ५) प्रवीण पोटे 6) सुरेश धस 7) विलास पोतनीस 8) निरंजन डावखरे 9) किशोर दराडे 10) कपिल पाटील 11) मनीषा कायंदे 12) भाई गिरकर 13) बाबाजानी दुर्रानी 14) निलय मधुकर नाईक 15) अनिल परब 16) रमेश पाटील 17) रामराव पाटील 18) डॉ. मिर्झा वजाहत मिर्झा 19) प्रज्ञा सातव 20) महादेव जानकर 21) जयंत पाटील ( शेकाप )

हेही वाचा :

  1. विधान परिषदेच्या १२ सदस्यांची यादी राज्यपालांकडे सादर; निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
  2. पोलिसांच्या मदतीने डान्सबार सुरू, अनिल परब यांचा विधान परिषदेत दावा

ABOUT THE AUTHOR

...view details