महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'एसआरए' सर्वेक्षणावरून नवी मुंबईत महायुतीत वाद, शिंदे गटाच्या 'या' नेत्यानं उगारलं 'उपोषणास्त्र' - SRA Survey Issue Navi Mumbai - SRA SURVEY ISSUE NAVI MUMBAI

SRA Survey Issue Navi Mumbai : नवी मुंबईतील ऐरोली मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांनी राजकीय दबाव वापरून एसआरए सर्वेक्षण रोखल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी केलाय. सोबतच ते नवी मुंबईत गणेश नाईकांविरुद्ध उपोषणाला बसले आहेत. वाचा काय आहे प्रकरण...

SRA Survey Issue Navi Mumbai
विजय चौगुले यांचे उपोषण (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 1, 2024, 10:03 PM IST

नवी मुंबईSRA Survey Issue Navi Mumbai :एसआरए सर्वेक्षणावरून नवी मुंबईत महायुतीत वाद सुरू असून तो वाद आता चव्हाट्यावर आलेला पहायला मिळत आहे. नवी मुंबईतील ऐरोली मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांच्यात चांगलीच जुंपली असल्याचं चित्र नवी मुंबईत पाहायला मिळत आहे.

नवी मुंबईतील 'एसआरए' सर्वेक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना विजय चौगुले (ETV Bharat Reporter)

गणेश नाईक यांनी राजकीय दबाव वापरून एसआरए सर्वेक्षण रोखलं असल्याचा आरोप करत विजय चौगुले हे नवी मुंबईत उपोषणाला बसले आहेत. "जोपर्यंत बायोमेट्रिक सर्वेक्षण होत नाही तोपर्यंत हे उपोषण सोडणार नाही," असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

राजकीय दबाव वापरून सर्वेक्षण बंद पाडलं : "नवी मुंबईतील ऐरोली मतदारसंघाचे भाजपाचे आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात शिंदे गटाचे जिल्ह्याध्यक्ष विजय चौगुले आमरण उपोषणाला बसले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिघा झोपडपट्टीच्या एसआरए सर्वेक्षणाला मंजुरी दिली होती. मात्र ऐरोलीचे आमदार गणेश नाईकांनी स्वार्थापोटी राजकीय दबाव वापरला आणि सर्वेक्षण बंद पाडलं," असा धक्कादायक आरोप विजय चौगुले यांनी केला आहे.

आमची लढाई ऐरोली मतदारसंघाच्या आमदारांविरोधात : "नवी मुंबईतील झोपडपट्टीचं बायोमॅट्रिक सर्वेक्षण पुन्हा सुरू झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, असा इशारा देखील चौगुले यांनी दिला आहे. 'धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय', अशी गणेश नाईक यांची सध्याची अवस्था आहे. या आधीही चौगुले यांनी नाईकांवर टीका केली आहे. झोपडपट्टीमधील १० ते १५ टक्के लोकांचं सर्वेक्षण झालं होतं. मात्र त्यानंतर राजकीय दबाव वापरून ते गणेश नाईकांनी बंद केल्याचा चौगुले यांनी आरोप केला आहे. झोपडपट्टीतील लोकांना त्यांचा न्यायहक्क मिळवून देण्यासाठी उपोषण करत असल्याची प्रतिक्रिया विजय चौगुले यांनी व्यक्त दिली. "आमची लढाई सरकारच्या विरुद्ध नाही तर येथील ऐरोली मतदारसंघाच्या आमदारांविरोधात आहे," असंही ते म्हणाले.

हेही वाचा :

  1. राज्यात एकही आमदार नसलेल्या रामदास आठवलेंचा अजब दावा; म्हणाले, ...तर मीच मुख्यमंत्री होणार - Ramdas Athawale
  2. 'मनसे हा सुपारीबाज पक्ष...,' आदित्य ठाकरेंचा टोला - Aditya Thackeray Pune Visit
  3. देवेंद्र फडणवीस यांच्यात राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे पूर्ण गुण: ही तर आमच्यासाठी आनंदाची बाब, 'या' मंत्र्यांनी व्यक्त केलं मत - Chandrakant Patil Statement

ABOUT THE AUTHOR

...view details