महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यात सर्व्हिसिंग सेंटरमध्ये कॉम्प्रेसरचा स्फोट; एक जण जागीच ठार, दोन गंभीर जखमी, पाहा व्हिडिओ - Satara Compressor explosion - SATARA COMPRESSOR EXPLOSION

Satara Compressor explosion : सातारा शहरातील माची पेठ भर दुपारी कॉम्प्रेसरच्या भीषण स्फोटाने हादरली. स्फोटामुळे घरांच्या खिडक्यांचा काचा फुटल्या. तसंच स्फोटाच्या आवाजामुळं परिसरात एकच खळबळ उडली. हा स्फोट नेमका कॉम्प्रेसरचा झाला की वाहनात गॅस भरताना झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Satara Compressor explosion
सर्व्हिसिंग सेंटरमध्ये कॉम्प्रेसरचा स्फोट (Source - ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 2, 2024, 7:16 PM IST

Updated : Oct 2, 2024, 7:27 PM IST

सातारा Satara Compressor explosion :साताऱ्यातील माची पेठ परिसर दुपारी सर्व्हिसिंग सेंटरमधील कॉम्प्रेसरच्या स्फोटानं हादरला. या स्फोटात एक जागीच ठार, तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. मुनीर पालकर (वय 35, रा. गुरुवार परज, सातारा) असं मृताचं तर हारूण बागवान आणि उमर बागवान, अशी गंभीर जखमींची नावं आहेत. या स्फोटामुळं आजुबाजूच्या घरांतील खिडक्यांचा काचा फुटल्या.

एकाचा जागीच मृत्यू :सातारा शहरातील माची पेठेत अदालत वाड्याजवळ असलेल्या सर्व्हिसिंग सेंटरमध्ये भर दुपारी भीषण स्फोट झाला. शाहूपुरी आणि सातारा शहर पोलिसांना या स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. स्फोट एवढा भयानक होता की, सर्व्हिसिंग सेंटरच्या बाजूच्या दुकानात बसलेल्या तिघांपैकी मुनीर बागवान हा 30 फूट दूरवर उडाला आणि डांबरी रस्त्यावर पडला. त्याच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. कॉम्प्रेसरचा स्फोट शॉर्टसर्किटनं झाला की वाहनात गॅस भरताना झाला, हे स्पष्ट झालेलं नाही.

सर्व्हिसिंग सेंटरमध्ये कॉम्प्रेसरचा स्फोट (Source - ETV Bharat Reporter)

सलग दोन स्फोट झाल्याचं प्रत्यक्षदर्शींंचं म्हणणं :सर्व्हिसिंग सेंटरलगतच्या दुकानात बसलेले आणखी दोघे जण या स्फोटात गंभीररित्या जखमी झाले आहेत. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. घटनास्थळाच्या परिसरात रक्ताचा सडा पडला होता. दरम्यान, एकापाठोपाठ सलग दोन स्फोट झाल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. स्फोटानंतर हवेत धुराचे लोट पसरले होते. घटनेनंतर बघ्यांची मोठी गर्दी झाल्यानं पोलिसांनी समर्थ मंदिर ते पोवई नाका रस्ता पोलिसांनी बंद केला. बाँब शोधक, नाशक पथक आणि सातारा शहर पोलीस या स्फोटाचा तपास करत आहेत.

हेही वाचा

  1. धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांनी केली आत्महत्या, मृतकाच्या खिशात सापडली सुसाईड नोट - Nagpur Suicide
  2. छत्रपती संभाजीनगरमध्ये सहा महिन्याचा बाळासह महिला डॉक्टरची आत्महत्या - Female doctor suicide
  3. सुनील तटकरेंना घेऊन जाण्यापूर्वी बावधानमध्ये कोसळलं हेलिकॉप्टर, २ वैमानिकांसह इंजिनिअरचा मृत्यू - Helicopter crashes in bavdhan
Last Updated : Oct 2, 2024, 7:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details