महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साईनगरीत सामुदायिक विवाह सोहळ्यात 41 जोडपे विवाहबद्ध; 24 वर्षांपासून कोते दाम्पत्य करतंय आयोजन - marriage ceremony

Wedding Story : साईनगरीत मंगलमय वातावरणात व हजारो वऱ्हाडींच्या साक्षीनं 41 जोडप्यांनी एकमेकांना साथ देण्याची शपथ घेत साईंच्या साक्षीनं आयुष्यभरासाठी लग्नगाठ बांधली. शिर्डीतील कोते दाम्पत्यांनी हा विवाह सोहळा आयोजित केला होता.

Wedding Story
साईनगरीत सामुदायिक विवाह सोहळ्यात 41 जोडपे विवाहबद्ध (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 3, 2024, 10:18 PM IST

साईनगरीत सामुदायिक विवाह सोहळ्यात 41 जोडपे विवाहबद्ध (Reporter)

शिर्डी Wedding Story : साईनगरीत मंगलमय वातावरणात व हजारो वऱ्हाडींच्या साक्षीनं 41 जोडप्यांनी एकमेकांना साथ देण्याची शपथ घेत साईंच्या साक्षीनं आयुष्यभरासाठी लग्नगाठ बांधली. शिर्डीतील कोते दाम्पत्य केवळ एक रुपया घेत गेल्या 24 वर्षापासून दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करतय. या दांपत्यानं आतापर्यंत 2250 मुलींचं कन्यादान केलंय. सर्वसामान्य कुटूंबाला मोलाचा आधार त्यांनी दिलाय.

2250 मुलींचं कन्यादान : एखाद्या मुलीच्या बापाला आपल्या मुलीचं लग्न करायचं कसं ? हि चिंता भेडसावत असते. मात्र शिर्डीतील कैलासबापू कोते यांनी अशा सर्व लोकांना मोलाचा आधार दिलाय. एक दोन नव्हे तर गेल्या 24 वर्षापासून आत्तापर्यंत त्यांनी 2250 मुलींचं स्वखर्चानं शाही थाटामाटात त्यांनी कन्यादान केलंय. दरवर्षी सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचं भव्य आयोजन कैलासबापू करत असतात. आकर्षक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतीषबाजी, मुलीला सगळा साजश्रृंगार, संसाराला लागणारी सर्व भांडी, सोन्याच्या मंगळसुत्रासह सगळा थाटमाट हे दाम्पत्य करत असतात. स्वतःला मुलगी जरी नसली तरी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करुन आता पर्यंत सुमीत्रा कोते 2250 मुलींची आई झाल्या आहेत.

स्वतः करतात लग्नाची तयारी : आपल्याला मुलगी नाही म्हणुन काय झालं, आपण इतर आई वडीलांना आधार देवु शकतो या भावनेतून आजवर 2250 च्यावर मुलींच कन्यादान करणाऱ्या सुमीत्रा कोते स्वतः लग्नाची सर्व तयारी करतात. दोन महिने अगोदरच त्यांची लगबग सुरु होते. मुलींच्या साड्या, साज श्रृंगार, संसारोपयोगी साहित्य स्वतः खरेदी करतात. अगदी आपल्या मुलीचं लग्न असल्यासारखी त्यांची धावपळ सुरु असते. कोणत्याही मुलीच्या बापाला आपल्या मुलीचं लग्न म्हणजे ओझं वाटू नये यासाठी आम्ही दरवर्षी हा सोहळा आयोजित करत असल्याचं त्या सांगतात. इतकंच नव्हे या लग्नातुन लेक वाचवा, लेक शिकवा, स्त्री भ्रूण हत्या टाळा, हुंडा घेऊ नका, देऊ नका असा संदेश दिला जातो. या सामुदायिक सोहळ्यात लग्न झालेल्या वधुस पहीली मुलीगी झाल्यास तीच्या नावारवर अकरा हजार रुपयांची ठेव पावती ही गेल्या पाच वर्षा पासुन ठेवण्याचा उपक्रम सुरु केलाय.


विवाह सोहळा ठरतोय मोलाचा आधार : श्री साईसिध्दी चँरीटेबल ट्रस्ट व शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने अवघ्या 1 रुपयांत सर्वधर्मिय सामुदायिक सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. कोणताही बाप मुलीच्या लग्नाच्या ओझ्यामुळं कर्जबाजारी होतो. त्यामुळं परीस्थीती हालाकीची असलेल्या कुटुंबीयांना हा सामुदायिक विवाह सोहळा मोठा आधार ठरतोय. अपेक्षेपेक्षा चांगल आयोजन केल्यानं नवरी-नवरदेवही अगदी आनंदी होतात. विवाहावर होणारा अनाठायी खर्च करण्यापेक्षा आपल्या संसाराला, मुलाबाळांच्या शिक्षणासाठी खर्च करणं गरजेचं असून समाजात जर असे उपक्रम मोठ्या प्रमाणात सुरु झाले तर कोणताही बाप मुलीच्या लग्नाच्या ओझ्यामुळं आत्महत्या करणार नाही. आपल्या मुलीच्या लग्नाची चिंता असलेल्या अनेक पित्यांना हा विवाह सोहळा मोलाचा आधार ठरलाय.

हेही वाचा :

  1. साईबाबांच्या दर्शनासाठी नीता अंबानी शिर्डीत; पाहा व्हिडिओ - Nita Ambani Sai Baba Darshan
  2. हनुमान जयंती 2024 ; शिर्डीत 125 किलो वजनाचा बजरंग गोटा उचलण्याची स्पर्धा: इतक्याच तरुणांना उचलता आला 'बजरंग गोटा' - Hanuman Jayanti 2024

ABOUT THE AUTHOR

...view details