मुंबई Cocain of 15 Crore Seized : डीआरआयनं (महसूल गुप्तचर संचालनालय) मोठी कारवाई करत 15 कोटी रुपयांचं कोकेन ड्रग्ज जप्त केलंय. याप्रकरणी विदेशी नागरिकाविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला मुंबई विमानतळावरुन अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या विदेशी नागरिकाच्या पोटातून कोकेनच्या तब्बल 77 कॅप्सूल काढून जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 15 कोटी रुपये आहे.
पोटातून 77 कॅप्सूल काढल्या बाहेर : मुंबई डीआरआय ( महसूल गुप्तचर संचालनालय) मुंबई विभागीय युनिटच्या अधिकाऱ्यांनी विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे सीएसएमआय विमानतळ मुंबई इथं ड्रग्ज बाळगल्याचा संशय असलेल्या कोटडी आयव्होअर नागरिकाला थांबवलं. त्याच्याकडं सतत चौकशी केल्यावर, प्रवाशानं भारतात तस्करी करण्यासाठी अंमली पदार्थाच्या कॅप्सूलचं सेवन करुन शरीरात लपवून ठेवल्याची कबुली दिली. प्रवाशाला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं आणि न्यायालयाच्या आदेशानंतर त्याला मुंबईतील सर जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी परदेशी नागरिकाच्या पोटातून सुमारे 15 कोटी रुपयांच्या 1468 ग्रॅम कोकेनच्या एकूण 77 कॅप्सूल बाहेर काढल्या.
अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी अनोखी शक्कल; चौकशी करताच डीआरआयचे अधिकारी चक्रावले - DRI Seized Cocain - DRI SEIZED COCAIN
Cocain of 15 Crore Seized : मुंबई विमानतळावर एका विदेशी नागरिकाच्या पोटातून कोकेनच्या तब्बल 77 कॅप्सूल काढून जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 15 कोटी रुपये आहे.
Published : May 9, 2024, 10:20 PM IST
परदेशी प्रवाशाला अटक : डीआरआय मुंबई झोनल युनिटच्या अधिकाऱ्यांनी 6 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ इथं ड्रग्ज बाळगल्याच्या संशयावरुन एका कोटेडिवोअर या परदेशी नागरिकाला अटक केली होती. सततच्या चौकशीच्या आधारे प्रवाशानं ड्रग्ज असलेल्या कॅप्सूलचं सेवन केल्याचे आणि भारतात तस्करी करण्यासाठी ते शरीरात आणल्याचे कबूल केलं. 6 मे ते 8 मे या कालावधीत रूग्णालयात ठेवून परदेशी प्रवशाच्या पोटातून 15 कोटीचं कोकेन बाहेर काढण्यात आलं. 8 मे रोजी एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदीनुसार कोकेन पदार्थ जप्त करण्यात आला. या प्रवाशाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे
हेही वाचा :