महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्री शिंदेंनी घेतलं रामटेकच्या गडमंदिरात प्रभू श्रीरामाचं दर्शन, गडमंदिर विकासासाठी देणार आवश्यक निधी

CM Eknath Shinde Ramtek Mandir : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री येथील गड मंदिराला भेट दिली व प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतलं. गड मंदिराच्या विकासासाठी राज्य शासनाच्या वतीनं आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 12, 2024, 10:16 AM IST

नागपूर (रामटेक)CM Eknath Shinde Ramtek Mandir : नागपूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी आज प्रभू श्रीरामाची पूजा केली. त्यांनतर त्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी मंदिर समितीच्या वतीनं मंदिराविषयीची माहिती शिंदे यांना देण्यात आली. गड मंदिराच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही यासाठी पाठपुरावा करावा, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.



लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा : लोकसभा निवडणुकीच्या तयारीला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेनं 'शिवसंकल्प अभियान' आयोजित केलं आहे. गड मंदिराच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. नागपूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी यांनी गडमंदिरला आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही यासाठी पाठपुरावा करावा, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. यावेळी खासदार कृपाल तुमाने, आमदार ॲड.आशिष जायस्वाल, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत आदी उपस्थित होते.

जो राम का नहीं, वो किसी काम का नहीं : "काही लोक श्री रामाच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न निर्माण करतात. आम्ही अयोध्येला जात होतो. मात्र, आमच्या बॅगा विमानातून काढायला लावल्या होत्या", असं म्हणत उद्धव ठाकरेंमुळं आपल्याला श्री रामाचं दर्शन घेता आलं नाही, अशी खंत शिंदे यांनी व्यक्त केलीय. 'जो राम का नहीं, वो किसी काम का नहीं' असा डायलॉगही मारत शिंदे म्हणाले, "श्रीरामाच्या आशीर्वादानं आमचं सरकार आलं. त्यानंतर ठाकरेंकडून सातत्यानं पक्ष चोरला, बाप चोरला असा आरोप होतो. मात्र, बाळासाहेब चोरायला काय ते एखादी वस्तू आहेत का"? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. ते रविवार (11 फेब्रुवारी) नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे शिवसेनेच्या आयोजित शिवसंकल्प अभियानात बोलत होते.

हेही वाचा -

  1. "दाढी हलकी समजू नका, काडी फिरवली तर लंका जळून जाईन"; मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर तोफ
  2. 'मंदिरात तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाणे, बाहेर आल्यावर प्रतिक्रिया देणं आपल्याला जमत नाही'; जितेंद्र आव्हाडांचा पत्रकारांपुढे टोला
  3. गुंडांसोबत फोटो व्हायरल झाल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अलर्ट मोडवर; घेतला 'हा' मोठा निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details