महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीड खंडणी प्रकरण : वाल्मिक कराड केज न्यायालयात हजर, सीआयडीचा मोठा दावा - SANTOSH DESHMUKH MURDER

बीड इथल्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी वाल्मिक कराड यानं शरणागती पत्करल्यानंतर त्याला केजच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Santosh Deshmukh Murder
संशयित आरोपी वाल्मिक कराड (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 31, 2024, 9:20 PM IST

बीड :अवादा कंपनी खंडणी प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड याला सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी पुण्यावरुन केजला हलवलं आहे. सीआयडीचे अधिकारी वाल्मिक कराडला घेऊन केज न्यायालयात पोहोचले असून त्याला केज न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरू आहे. सीआयडीनं आतापर्यंत 4 आरोपीला अटक केली आहे. त्यानंतर फरार असलेल्या वाल्मिक कराड यानं आज सीआयडीच्या कार्यालयात शरणागती पत्करली. यानंतर त्याला ताब्यात घेऊन सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केज गाठलं. वाल्मिक कराडला कोठडी दिल्याशिवाय फरार आरोपींचा शोध लागणार नाही. सरपंच संतोष देशमुख हत्याकांड आणि खंडणी प्रकरण संबंधित असल्याचा मोठा दावा सीआयडीच्या वकिलांनी न्यायालयात केला.

कराड समर्थकांची सीआयडी कार्यालया बाहेर गर्दी :बीडमधील खंडणी प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड सीआयडी ऑफिसमध्ये सरेंडर झाला. मंगळवारी 12 वाजता पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये वाल्मिक कराड सरेंडर झाला आहे. कराड समर्थकांनी या कार्यालयाबाहेर गर्दी केली. संतोष देशमुख हत्या प्रकरण सीआयडीकडं वर्ग करण्यात आल्यानंतर तपासाला वेग आला. सीआयडी अधिकाऱ्यांनी वाल्मिक कराड याच्या निकटवर्तीयांची कसून चौकशी केली. त्याशिवाय पासपोर्ट रद्द करण्याची सरकारकडं मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर वाल्मिक कराड याची सर्व बँक खाती फ्रीज करण्यात आली.

वाल्मिक कराडवर खंडणीचा खोटा आरोप :वाल्मिक कराड याचा शोध सीआयडीकडून घेतला जात होता. जमा झालेल्या कार्यकर्त्यांनी मात्र, "आम्ही सीआयडीच्या अधिकार्‍यांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत. वाल्मिक कराड आरोपी नाहीत. खंडणीचा त्यांच्यावर खोटा आरोप करण्यात आला असून त्यानुसार गुन्हा दाखल केला," असं समर्थकांचं म्हणणं आहे. पुण्यातून 4 सीआयडीची विशेष पथकं वाल्मिक कराडच्या शोधासाठी सक्रिय होते. पुण्यातून पहाटे 2 तर सकाळी 1 पथक वाल्मिक कराडच्या शोधासाठी रवाना झाले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराडचं नाव विरोधकांकडून घेतलं जात आहे. सीआयडीनं वाल्मिक कराडच्या भोवती तपासाचा फास आवळला. त्याच्या निकटवर्तीयांची कसून चौकशी केली. त्याशिवाय सर्व बँक खाती फ्रीज करण्यात आली. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या वाल्मिक कराडला आज सरेंडर करणं भाग पडलं, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा :

  1. संतोष देशमुख हत्याकांडात कोणाचीही गय केली जाणार नाही, सीआयडीला पूर्ण मोकळीक : देवेंद्र फडणवीस
  2. अखेर वाल्मिक कराडची शरणागती: सीआयडी अधिकारी कराडला घेऊन केजकडं रवाना
  3. संतोष देशमुख हत्याकांड : वाल्मिक कराडला घेऊन सीआयडी पथक रवाना, उशीरा करणार न्यायालयात हजर

ABOUT THE AUTHOR

...view details