मुंबई Eknath Shinde On Sam Pitroda : काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी वर्णद्वेशी वक्तव्य केलं होतं. सॅम पित्रोदा यांच्या या टीकेमुळे देशभरात संतापाची लाट उमटत आहे. सॅम पित्रोदा यांच्या या वर्णद्वेशी वक्तव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पित्रोदा यांच्या या वर्णद्वेशी वक्तव्यावरुन देशातील राजकारणाची पातळी घसरली आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
काय केलं होतं सॅम पित्रोदा यांनी वक्तव्य :काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी भारताच्या विविधतेबद्दल मत व्यक्त केलं होतं. मात्र यावेळी बोलताना त्यांनी भारताच्या पूर्वेला राहणारे नागरिक चीनी नागरिकांसारखे दिसतात. तर पश्चिमेला राहणारे नागरिक अरब लोकांसारखे दिसतात. उत्तर भारतात राहणारे नागरिक गोऱ्यांसारखे दिसतात, तर दक्षिण भारतात राहणारे नागरिक आफ्रिकी लोकांसारखे दिसतात. मात्र या दिसण्यावरुन काही फरक पडत नाही. आपण सगळे नागरिक या देशाचे बंधू भगिनी आहोत. भारतात सगळ्याच धर्माला सारखाच सन्मान मिळतो, असं सॅम पित्रोदा यांनी सांगितलं. सॅम पित्रोदा यांच्या या वर्णद्वेशी वक्तव्याचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर मात्र सॅम पित्रोदा यांच्या या वर्णद्वेशी वक्तव्यामुळे त्यांच्यावर मोठी टीकेची झोड उठवण्यात आली.