महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रिक्षा अपघातातील जखमी महिलेच्या मदतीला मुख्यमंत्र्यांची धाव - Chief Minister Eknath Shinde - CHIEF MINISTER EKNATH SHINDE

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रसंगावधानता आणि संवेदनशीलता पुन्हा एकदा समोर आली आहे. आज सकाळी ठाणे येथून अधिवेशनासाठी विधानसभेकडे येत असताना विक्रोळी जवळ एका रिक्षाचा अपघात झाला. त्यावेळी शिंदे यांनी त्यांचा ताफा थांबवत अपघातग्रस्त महिलेची मदत केली.

Chief Minister Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Etv Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 10, 2024, 4:41 PM IST

मुंबईEknath Shinde :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य नागरिकांसाठी रस्त्यावर उतरून काम करण्यासाठी ओळखले जातात. प्रवासादरम्यान मुख्यमंत्र्यांचा ताफा असतो, काही प्रोटोकॉल असतात पण तरीही अपघात झाल्यावर मुख्यमंत्री सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून नागरिकांची मदत करताना आपण अनेकदा पाहिलय. आजही त्यांनी एका अपघातात जखमी झालेल्या महिलेची मदत केलीय.

मुख्यमंत्री जखमी महिलेची मदत करताना (ETV BHARAT Reporter)

महिलेला केली तत्काळ मदत : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी विविध अपघातातील अपघातग्रस्तांची मदत करत स्वतः संवाद साधला आहे. यापूर्वी त्यांच्या संवेदनशीलतेची अनेक उदाहरणे पाहायला मिळाली आहेत. विधानसभा अधिवेशन सुरू असल्यानं ठाणे येथील निवासस्थानाहून मुंबईकडं येत असताना विक्रोळी येथे एका रिक्षाचा अपघात झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ आपला ताफा थांबवत जखमी झालेल्या महिलेची चौकशी केली. तसंच मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात असलेल्या रुग्णवाहिकेतून आपला अधिकारीसोबत देऊन महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल करायला सांगितलं.

मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून दिली माहिती :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यात मुख्यमंत्री अपघातग्रस्तांना मदत करताना दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून ही माहिती दिली. विक्रोळीच्या रस्त्यावर रिक्षाचा अपघात झाला. तेथून मुख्यमंत्र्यांचा ताफा पुढं निघाला होता. तर ते अपघातग्रस्त मदतीची वाट पाहत होते. पण त्यांच्याकडं मदतीची कोणतंही साधन नव्हतं. दरम्यान, ठाण्यातून विधानभवनाच्या दिशेने जात असताना मुख्यमंत्र्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी थाफा थांबवत महिलेला मदत केली.

महिलेकडून मुख्यमंत्र्यांचे आभार : या अपघातात किरकोळ जखमी झालेल्या महिलेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तसंच पुढील उपचारासाठी सदर महिला रुग्णालयात दाखल झाली. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवलेल्या या संवेदनशीलतेमुळं त्यांची संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून असलेली प्रतिमा आणखी अधोरेखित झाली आहे.

'हे' वाचलंत का :

  1. "विरोधकांना समाज नाही तर निवडणुका महत्वाच्या...", देवेंद्र फडणवीसांचा आरक्षणाच्या बैठकीवरून विरोधकांवर हल्लाबोल - Maratha OBC Reservation
  2. वरळी हिट अँड रन प्रकरण : मिहिर शाह आणि मुख्यमंत्र्यांचे व्यावसायिक संबंध, संजय राऊतांचा गंभीर आरोप - worli hit and run case
  3. केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना मोठा दिलासा; विधानसभा निवडणुकीपूर्वी दिला 'हा' निर्णय - ECI on NCP SCP

ABOUT THE AUTHOR

...view details