कोल्हापूर :छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाच्या ट्रेलरला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. मात्र, प्रदर्शनाआधीच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.
शिवप्रेमींची नाराजी :चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या संभाजी महाराज यांच्या नृत्याविष्कारावर अनेक शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. स्वराज्य पक्षाचे संस्थापक माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी इतिहास संशोधक आणि आमच्याशी चर्चा करायला हवी होती. तसेच चित्रपटातील काही दृश्य दुरुस्त करायला हवीतं असं मत व्यक्त केलं आहे.
संभाजीराजेंची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter) ट्रेलरला प्रतिसाद :छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर 'छावा' हा हिंदी चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका अभिनेता विकी कौशिल याने साकारली आहे. नुकतंच लॉन्च झालेल्या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
लेझीम खेळणं चुकीचं नाही परंतु... : चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज लेझिमवर नृत्य करताचं दृश्य दाखवलं आहे. छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळताना दाखविणे चुकीचं नाही. परंतु, ते लेझिमवर नृत्य करताना दाखविलं आहे. सिनेमॅटिक लिबर्टी किती घ्यावी याला देखील काही मर्यादा आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर छावा चित्रपट येतोय ही आनंदाची बाब आहे. छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी माझी भेट घेतली होती. त्यावेळील चित्रपट झाल्यानंतर तो इतिहास अभ्यासकांसोबत आम्हाला दाखवा अशी विनंती त्यांना मी केली होती, आता देखील त्यांना विनंती आहे. त्यांनी आम्हाला आणि इतिहास संशोधकांना तो चित्रपट दाखवावा.
चित्रपटात कोणत्याही उणिवा राहू नयेत ही आमची भूमिका : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर चित्रपट तयार करणारे दिग्दर्शक उतेकर हे एक मराठी माणूस आहेत. त्यांनी खूप मोठं धाडस करून संभाजी महाराजांवर चित्रपट बनवला आहे. त्यामुळे यामध्ये कुठलेही चुका राहू नयेत अशीच आमची इच्छा असल्याचं माजी खासदार संभाजी राजे यावेळी सांगितलं. दिग्दर्शक उतेकर आणि आमची एकच भूमिका छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा अशीच आमचीही भूमिका आहे. मात्र, इतिहास नव्या पिढीसमोर मांडताना त्यामध्ये कोणत्याही उणिवा राहू नयेत यासाठीच, एकदा चित्रपटाचे दिग्दर्शक उतेकर यांनी इतिहास संशोधकांसह शिवछत्रपतींचे वंशज म्हणून आम्हालाही चित्रपट दाखवून प्रदर्शित करावा जेणेकरून यामध्ये उणिवा राहणार नाहीत असं माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यावेळी म्हणाले.
हेही वाचा :
-
सिंहाच्या गर्जनेसह 'छावा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, पाहा व्हिडिओ - Vicky Kaushal - 'महाराणी येसूबाईं'च्या भूमिकेतील रश्मिका मंदान्नाचा फर्स्ट लूक, 'छावा'च्या ट्रेलरची प्रतीक्षा सुरू
- 'छावा' चित्रपटाला मराठा समाजाचा विरोध....लाल महाल येथे आंदोलन...