महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कला शाखा निवडण्याचा माझा निर्णय फायद्याचा ठरला... छत्रपती संभाजीनगरच्या चैत्राची सीबीएसईत उत्तुंग भरारी - CBSE Board Result 2024 - CBSE BOARD RESULT 2024

CBSE Board Result 2024 : मंगळवारी सीबीएसई बोर्ड परीक्षेचा (CBSE Board) निकाल जाहीर झाला. त्यानंतर यशस्वी विद्यार्थ्यांनी सर्वत्र आनंद साजरा केला. छत्रपती संभाजीनगरची चैत्रा दिवान (Chaitra Diwan) या विद्यार्थिनीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय. तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. तिच्याशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी बातचित केली.

Chaitra Diwan
चैत्रा दिवान (Chhatrapati Sambhajinagar Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 15, 2024, 6:59 PM IST

प्रतिक्रिया देताना चैत्रा दिवान (Chhatrapati Sambhajinagar Reporter)

छत्रपती संभाजीनगर CBSE Board Result 2024: आजच्या तांत्रिक युगात शिक्षण घेताना विज्ञान शाखेकडं बहुतांश विद्यार्थ्यांचा कल पाहायला मिळतो. पुढील शैक्षणिक आणि कामात मिळणाऱ्या संधी लक्षात घेता आजकालची पिढी विज्ञान आणि वाणिज्य शाखा अधिकपणे निवडताना दिसून येतात. मात्र, कला विभागात चांगलं यश मिळवता येतं हे शहरातील युवतीनं सिद्ध केलंय. शहरात राहणाऱ्या चैत्रा दिवान (Chaitra Diwan) या युतीनं सीबीएसई बोर्डात (CBSE Board) राज्यात सर्व विभागातून पहिला क्रमांक पटकावला आहे, तेही कला विभागातून. चैत्राला मिळालेल्या यशानं कला विभागात शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकाला तिची प्रेरणा मिळणार आहे.



राज्यात पटकावला पहिला नंबर : 13 मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदानाची धामधूम सुरू असताना सीबीएससी बोर्डाने निकाल जाहीर केला. त्यात छत्रपती संभाजीनगर येथील चैत्रा दिवान या विद्यार्थिनीनं राज्यात पहिला क्रमांक पटकावला. तिनं कला विभागात शिक्षण घेऊन विज्ञान, वाणिज्य आणि कला या तिन्ही विभागात सर्वाधिक गुण मिळवत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. चैत्राला ५०० पैकी ४९७ गुण पडले असून तिनं चक्क ९९.४ % मिळवले आहे. तिच्या मेहनतीनं आणि इच्छाशक्तीनं तिनं घवघवीत यश संपादन केलंय.

कला शाखेत जाण्याचा निर्णय : १० वीत ९४.९५% गुण चैत्रालाला मिळाले होते. तिनं विज्ञान शाखेत न जाता कला शाखेत जाण्याचा निर्णय घेतला आणि तिचा निर्णय सार्थ ठरवला. तिची आई अनन्या आणि वडील मकरंद दिवान दोघेही डॉक्टर आहेत. असं असलं तरी मुलांच्या शैक्षणिक निर्णय प्रक्रियेत आपण हस्तक्षेप न करता मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली अशी प्रतिक्रिया, चैत्राच्या आई अनन्या आणि वडील मकरंद यांनी दिली.



अभ्यासाचं नियोजन केल्यानं यश : दहावीपर्यंत शिक्षण घेताना कला विभागात शिक्षण घ्यायचा कुठलाही उद्देश नव्हता. मात्र, मानसशास्त्रात माझा रस अधिक असल्यानं, मी त्या विभागाकडं गेल्याचं चित्रा सांगते. वेळोवेळी अभ्यासाचं योग्य नियोजन केलं. रोज सहा ते सात तास अभ्यास आणि काहीवेळा दहा ते बारा तास देखील अभ्यास केला. यात आई-वडिलांनी मोलाची साथ दिली. शिक्षकांनी देखील योग्य मार्गदर्शन केल्यामुळं यश मिळवता आलं. आधीपासूनच घरातील वातावरण चांगलं होतं. त्यामुळं कला विभागात कोणतेही क्लासेस न लागता मला चांगलं यश मिळवता आल्याचं चैत्रा सांगते. ती पुढील शिक्षणासाठी पुण्यात जाऊन मानसशास्त्र विषयावरच अभ्यास करणार आहे.

हेही वाचा -

  1. 'सीबीएसई'कडून दहावीसह बारावीचा निकाल जाहीर; दोन्ही बोर्डाच्या निकालात मुलींचीच हवा - CBSE 2024 results
  2. जेईई-मेन परीक्षेचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील तब्बल 'इतक्या' विद्यार्थ्यांनी मिळवले 100 गुण - JEE Main Results
  3. कोल्हापूरच्या लेकीचा युपीएससीत झेंडा; जिल्हाधिकारी पदाला घातली गवसणी - UPSC Success Story

ABOUT THE AUTHOR

...view details