मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी सिल्व्हर ओक बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भेट कोणतीही राजकीय हेतूनं नसल्याचं भुजबळांनी सांगितलं.
मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवाराच्या भेटीबाबत भूमिका स्पष्ट केली. भुजबळ म्हणाले, "आज मी पवारासाहेबांकडे गेलो होते. त्यांची मी वेळ आधी घेतली नव्हती. पण ते घरी आहेत, हे कळल्यावर भेटायला गेलो. ते आजारी असल्यामुळे बेडवर झोपलेलो असताना भेटलो. मी मंत्री म्हणून किंवा राजकीय गोष्टीसाठी आलेलो नाही. हे मी त्यांना सांगितलं. महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना त्यांनी ओबीसी समाजाला आरक्षण देण्याचं काम केलं. पण आजकाल काही जिल्ह्यात ओबीसी आणि मराठा समाजामध्ये स्फोटक परिस्थिती तयार झालेली आहे. मराठा आणि ओबीसी यांच्यात दुफळी निर्माण झाल्याचं चित्र तयार झालंय. राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून समाजात शांतता निर्माण होण्यासाठी प्रयत्न करण्याचे विनंती केली." "मराठवाडा आंबेडकर विद्यापीठाच्या नामांतरानंतर दोन समाजात अशीच तेढ निर्माण झाली होती. त्यावेळी पवार सांहेबांनी समेट घडवून आणला होता," असंही भुजबळ म्हणाले.
भुजबळांच्या माहितीनुसार "मनोज जरांगे आणि हाके या दोन नेत्यांना काय आश्वासनं दिली आहेत, हे मला माहिती नाही", असं शरद पवार यांनी भुजबळांना सांगितले. त्यावर भुजबळ म्हणाले की, "तुम्ही राज्यातील सर्वात मोठे नेते असल्यामुळे तुम्ही या परिस्थितीत मार्ग करण्यासाठी बैठक बोलवावी. यावर पवार म्हणाले की, "मी स्वतः मुख्यमंत्री शिंदेंशी बोलतो. यावर कसा मार्ग काढता येईल, यावर चर्चा करतो. माझी तब्येत बरी नाही. पण मी यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करेन."
"राज्यातील वातावरण शांत ठेवण्यासाठीच या भेटीचा यामागचा हेतू होता," असं भुजबळ म्हणाले. "धनगर प्रश्न, ओबीसीचे प्रश्न आणि मराठा आरक्षण या विषयावर आमची चर्चा झाली. कालच बारामतीत टीका केल्यानंतर आज भेट झाली. याबद्दल भुजबळांनी हा राजकायणाचा विषय नसल्याचं सांगितलं. गोरगरीबांमध्ये दुफळी होऊ नये यासाठी भेट घेतल्याचं ते पुन्हा म्हणाले. आपल्या पक्षातील केवळ प्रफुल्ल पटेल यांना पवारांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शरद पवारांच्या बैठकीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन मार्ग काढावा. महाराष्ट्र शांत ठेवावा, असं आवाहन यावेळी भुजबळ यांनी केलं.
हेही वाचा -
- छगन भुजबळ शरद पवार यांच्या भेटीसाठी 'सिल्व्हर ओक'वर, भेटीचं कारण गुलदस्त्यात - CHHAGAN BHUJBAL MEETS SHARAD PAWAR
- छगन भुजबळांची आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवारांवर टीका; म्हणाले, बारामतीवरून फोन आला अन्.... - Chhagan Bhujbal
- बीडमध्ये मनोज जरांगे पाटील सरकारवर कडाडले!; छगन भुजबळ, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांचा घेतला समाचार - Manoj Jarange Patil