महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"नांदेड महसूल आयुक्त कार्यालयाबद्दल नेत्यांशी चर्चा...," नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे? वाचा सविस्तर - CHANDRASHEKHAR BAWANKULE NANDED

"मराठवाडा विभागातील दुसरं महसूल आयुक्तालय नांदेडला स्थापन व्हावं," अशी मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे.

Chandrashekhar Bawankule is in favour of establishing Revenue Commissioners Office in Nanded
चंद्रशेखर बावनकुळे (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 24, 2025, 10:17 AM IST

नांदेड : गेल्या तीन दिवसांपासून नांदेडमध्ये सुरू असलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा समारोप समारंभ रविवारी (२३ फेब्रुवारी) पार पडला. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं. तर दरवर्षी ही स्पर्धा घेण्यात येणार असून त्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा बावनकुळे यांनी केली. तसंच यावेळी त्यांनी महसूल आयुक्त कार्यालयासंदर्भातही भाष्य केलं.

नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे? : "नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या चार जिल्ह्यांचं महसूल कार्यालय नांदेड येथे व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. यासाठी विरोध करण्यात येईल. मात्र, आम्ही लातूरच्या आणि नांदेडच्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करु. मराठवाड्याला न्याय द्यायचा असेल, तर या भागात एक विभागीय आयुक्त कार्यालय असलंच पाहिजे. छत्रपती संभाजीनगरला आठ जिल्ह्यांचं विभागीय आयुक्त कार्यालय आहे. मात्र, त्यापेक्षाही महत्त्वाचा भाग नांदेडचा आहे. त्यामुळं याविषयी आम्ही नेत्यांशी चर्चा करु. तसंच यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचीही बैठक होईल. या चार जिल्ह्यांना न्याय मिळावा यावर माझं लक्ष आहे. लातूर की नांदेड, हा वाद नाही. विभागीय आयुक्त कार्यालय हे छत्रपती संभाजीनगरला असून त्याचं विभाजन केलं पाहिजे, या मताचा मी आहे. लवकरच याचा निर्णय होईल," असं बावनकुळे म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे यांचं भाषण (ETV Bharat Reporter)

महसूल कर्मचाऱ्यांनी AI चा वापर करावा :पुढं ते म्हणाले की, "२०१२-१३ पासून ते २०२४ पर्यंत महसूल मंत्र्यांच्या कार्यालयात एकूण ११८३ कर्मचारी आहेत. १८ हजार ८०० प्रकरणांना न्याय द्यायचाय. रोज शंभर सुनावण्या घेतल्या तरी न्याय मिळू शकत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रलंबित प्रकरणं आहेत. त्यामुळं या प्रकरणांना न्याय द्यायचा असेल, तर महसूल कर्मचाऱ्यांनी 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'चा वापर करावा."

83 क्रीडा प्रकारात लढती : दोन हजाराहून अधिक अधिकारी-कर्मचारी क्रीडापटूंचा तीन दिवसांचा क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेचा महोत्सव रविवारी सायंकाळी थाटात संपन्न झाला. वैयक्तिक, सांघिक आणि मिश्र अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, कोकण तसंच नोंदणी मुद्रांक आणि भूमी अभिलेख विभाग अशा एकूण सात विभागांमध्ये 83 क्रीडा प्रकारात लढती झाल्या. यावेळी बोलत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारा वर्षानंतर नांदेडमध्ये या क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्याचा आनंद व्यक्त केला.



हेही वाचा -

  1. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकार प्रयत्नशील : बावनकुळे
  2. 'ते' प्रामाणिक कार्यकर्ते; मुद्दा तडीस लावल्याशिवाय शांत बसणार नाहीत : चंद्रशेखर बावनकुळेंच स्पष्टीकरण
  3. ज्या नेत्यांना जनतेत जाऊन काम करता येत नाही, ते मशीनवर ठपका ठेवतात, चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details