महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बावनकुळे फडणवीस यांच्या पाठीशी खंबीर, म्हणाले मविआनं राज्यात खोटा प्रचार केला, फडणवीसांचा राजीनाम्याचा निर्णय केंद्रानं अमान्य करावा - Bawankule On Fadnavis Resignation - BAWANKULE ON FADNAVIS RESIGNATION

Bawankule On Fadnavis Resignation : महाविकास आघाडीला अपेक्षेपेक्षा चांगलं यश मिळाल्यानं महायुतीत अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र केंद्रीय नेतृत्वानं त्यांना राजीनामा स्वीकारू नये. तसंच विरोधकांनी खोटं बोलून यश मिळवल्याचा आरोपही बावनकुळे यांनी केला. ऐका आणि वाचा ते नेमकं काय म्हणाले...

Bawankule On Fadnavis Resignation
चंद्रशेखर बावनकुळे (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 6, 2024, 7:26 PM IST

नागपूरBawankule On Fadnavis Resignation : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपानंतर महायुतीमध्ये रणकंदन माजलं आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी घेत राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्यानंतर आज ते नागपूरला परतले आहेत. यावेळी शेकडोच्या संख्येने भाजपा नेते, कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी नागपूरच्या विमानतळावर एकत्रित झाले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनात कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या आहेत. यावेळी ते काहीही न बोलता निघून गेले.

चंद्रशेखर बावनकुळे यांचे फडणवीसांच्या राजीनाम्याबद्दल मत (ETV Bharat Reporter)

काय म्हणाले बावनकुळे :महाविकास आघाडीने राज्यात खोटा प्रचाराचा फुगा फुगवला. संविधान बदलाची खोटी चर्चा पेरली. आदिवासी समाजाला भीती दाखवली. त्यामुळेचं आम्हाला अपेक्षित यश मिळू शकलं नाही, असं बावनकुळे म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय आम्हाला अमान्य : देवेंद्र फडणवीस राज्याचे नेते आहेत. त्यांना निकालानंतर वाईट वाटणे हे स्वाभाविक आहे. गेल्या दहा वर्षांत देवेंद्र फडणवीस यांनी पुढे येऊन जनतेच्या हिताचं काम केलेलं आहे. तरी जनतेनं भाजपाला नाकारलं. त्यामुळे त्यांना वाईट वाटलं आहे; पण आम्ही केंद्रीय नेतृत्वाला विनंती केलेली आहे की, देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय अमान्य करावा, अशी मागणी केल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

भाजपाची उद्या दिल्लीत बैठक : उद्या दिल्लीत भाजपाच्या संसदीय बोर्डाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. बैठकीत भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांसह महत्त्वाच्या नेत्यांना बोलवण्यात आलं आहे. यात राज्यात भाजपाला मोठं खिंडार पडलं आहे. या मुद्दावरून नेत्यांची झाडाझडती होण्याची शक्यता आहे.

भाजपा कार्यकर्ते कुठेही कमी पडले नाही : महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याकरता भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता झटला आणि लढला आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. यश जरी आज मिळालं नसलं तरी उद्या मात्र एकत्रितपणे लढून यश मिळवता येतं. आरोप-प्रत्यारोप आणि एकमेकांवर खापर फोडून काही साध्य होणार नाही, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :

  1. झोपड्यांवर महापालिकेची करवाई: पवईत पोलिसांवर जमावाची दगडफेक, 5 पोलीस जखमी - Stone Pelting On Mumbai Police
  2. विकासाचे महामेरू नितीन गडकरी; महामार्ग, उड्डाणपूल, खडेबोल: काय आहे नागपूरचा गड राखणाऱ्या गडकरींच्या विजयाचं गमक - Nagpur Lok Sabha Result 2024
  3. महाराष्ट्राच्या 13 आमदारांनी आजमावलं लोकसभेत नशीब; तब्बल सात आमदारांना लागली खासदाराची लॉटरी - MLA Won In Lok Sabha Election Result 2024

ABOUT THE AUTHOR

...view details