अमरावती - Chandrababu Naidu : तेलुगु देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ते चौथ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत. विजयवाडा येथील गन्नावरम विमानतळाजवळील केसरपल्ली आयटी पार्क येथे आयोजित भव्य सोहळ्यात राज्यपाल एस अब्दुल नझीर यांनी त्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली.
या शपथविधीला देशातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यामध्ये पंतप्रधान मोदींचाही समावेश आहे. शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायडूंना मिठी मारून त्यांचे अभिनंदन केलं.
मंत्रिपदाची शपथ कोणी घेतली?
चंद्राबाबू नायडू यांच्या बरोबर ज्या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यामध्ये जनसेना पक्षाच्या चार आणि भाजपाच्या एका आमदाराचा समावेश आहे. त्याचबरोबर पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. याशिवाय टीडीपीचे राष्ट्रीय सरचिटणीस नारा लोकेश आणि केए नायडू यांच्यासह 24 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
शपथ घेतलेले आमदार
- कोल्लू रवींद्र
- नादेंडला मनोहर
- पोंगुरु नारायण
- अनिता वंगालपुडी
- सत्यकुमार यादव
- डॉ. निम्मला रामनायडू
- नस्यम मोहम्मद फारुक
- अनम रामनारायण रेड्डी
- पय्यावुला केशव
- अनग्नी सत्य प्रसाद
- कोळसू पार्थसारथी
- डोळा बाळा वीरंजनेय स्वामी डॉ
- गोटीपती रवि कुमार
- कंदुला दुर्गेश
- गुम्मदी संध्या राणी
- बीसी जनार्दन रेड्डी टी.जी. भरत
- एस. सविता
- वासमशेट्टी सुभाष
- कोंडापल्ली श्रीनिवास
- मंडीपल्ली रामप्रसाद रेड्डी
सोहळ्याला अनेक नेते उपस्थित