मुंबई-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या स्टॅटिक सर्व्हिलन्स पथकाकडून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. निवडणुकीच्या काळात मतदारांना पैसे वाटप होऊ नये, याकरिता ही काळजी घेण्यात येत आहे.
निवडणूक आयोगाच्या स्टॅटिक सर्व्हिलन्स टीमनं(एसएसटी) 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात एसएसटी तैनात करण्यात आले आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गुरुवारी पहाटे दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथे एका कारचा पोलिसांसह एससटीला संशय आला. यावेळी संशयास्पद असलेली कार थांबविण्यात आली. पोलिसांनी तपासणी केली असता कारमध्ये अमेरिकन डॉलर आणि सिंगापूर डॉलरसह विविध देशांच्या चलनी नोटा सापडल्या आहेत.
कारमध्ये रोकड घेऊन जाणाऱ्या व्यक्तीनं बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नावानं कागदपत्रे तयार केली आहेत. विमानतळावरून बँकेच्या कार्यालयात चलन नेले जात होते, असा कारमधील व्यक्तींनी दावा केला. जप्त केलेली रक्कम मोठी असल्यानं चलनी नोटी सीमाशुल्क विभागाकडं सुपूर्द करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसासह सीमाशुल्क विभागाकडून तपास करण्यात येत आहे.
या ठिकाणीही पोलिसांनी सोन्यासह पैसे केले जप्त
- नुकतेच सातारा जिल्ह्यात तासवडे टोलनाक्यावर तपासणी दरम्यान 5 कोटींचं सोनं आणि 60 किलो चांदी जप्त करण्यात आले . ही कारवाई FST पथक, GST अधिकारी, आयकर अधिकारी, तहसीलदार आणि कराड नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकानं केली. त्याची अंदाजे किंमत ७ कोटी ५३ लाख रुपये आहे.
- काही दिवसांपूर्वी पुण्यातील खेड शिवापूर येथे एका गाडीत पाच कोटी रुपये सापडले होते. हे पैसे सत्ताधारी आमदाराच्या जवळच्या व्यक्तीचे असल्याचा विरोधकांकडून आरोप करण्यात आला होता. शुक्रवारी पुण्यातील सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत 138 कोटींचं सोनं पकडलं होतं. जप्त केलेलं सोन हे सराफा व्यापाऱ्यांच्या मालकीचं असल्याचं कमोडिटी तज्ञ अमित मोडक यांनी सांगितलं. याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे.
- नाशिक-मुंबई महामार्गावरील कसारा घाटाच्या पायथ्याशी पोलिसांनी नाकाबंदीत एका वाहनातून तब्बल 2 कोटींचे घबाड सापडले होते. यावेळी पोलिसांनी रोख रकमेसह वाहन ताब्यात घेतलंय. तर नाशिकमधील दोन कारवाईत पोलिसांनी 31 लाख 50 हजारांची अवैध रक्कम जप्त केली.
हेही वाचा-
- विधानसभा निवडणूक 2024 : लोकसभेनंतर विधानसभेत बाबू भगरे पॅटर्न चालणार का ?
- मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये उमटणार बंडाचे पडसाद ? महायुती की मविआ मारणार मैदान ? अबू आझमींचा गड होणार खालसा ?