महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बोट दुर्घटनेप्रकरणी नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाकडून चौकशीचे आदेश - BOAT ACCIDENT IN MUMBAI

दुर्घटनेतून बचावलेल्या नाथाराम चौधरी या साकीनाका येथील 22 वर्षीय तरुणाच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केलाय. नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात आणि इतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Case registered against speedboat driver
स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : 11 hours ago

मुंबई-बुधवारी दुपारी 4 वाजता नौदलाची स्पीड बोट 'नीलकमल' या प्रवासी बोटीला धडकली. या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झालाय. तर या दुर्घटनेत अनेक जण जखमी झालेत. आता या प्रकरणात मुंबई पोलिसांनी स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा नोंदवलाय. या दुर्घटनेतून बचावलेल्या नाथाराम चौधरी या साकीनाका येथील 22 वर्षीय तरुणाच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नौदलाच्या स्पीड बोटीची धडक बसल्याने नीलकमल ही प्रवासी फेरीबोट बुडाली. त्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला असून, नौदलाच्या स्पीड बोट चालकाविरोधात आणि इतर संबंधितांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : या प्रकरणी नोंदणी क्रमांक 283/24 अन्वये कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम 106(1), 125 (a) (b), 282, 324 (3)(5) ही कलमं गुन्ह्यात लावण्यात आलीत. या प्रकरणात निष्काळजीपणा करून मृत्यूस कारणीभूत झाल्याची कलमे लावण्यात आलीत. या प्रकरणी कुलाबा पोलिसांनी काही जणांचे जबाबही नोंदवले आहेत. या अपघाताची नौदलाने गांभीर्याने दखल घेतली असून, स्वत: नौदल प्रमुख मुंबईत दाखल झालेत. नौदलाची स्पीड बोट आणि नीलकमल ही प्रवासी बोट यामध्ये घडलेल्या अपघाताप्रकरणी नौदलाकडून स्वतंत्र चौकशी करण्यात येत आहे. त्यासाठी नौदलाने चौकशी समिती नेमलीय.

नौदल प्रमुख मुंबईत दाखल, मृतांना श्रद्धांजली : भारतीय नौदलाचे प्रमुख आणि अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी मुंबईत दाखल झालेत. ते या प्रकरणाच्या चौकशीचा आढावा घेण्याची शक्यता आहे. नौदलाच्या पश्चिम विभागाच्या मुख्यालयात ते वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करतील. नौदल प्रमुखांनी या अपघातात मृत झालेल्या व्यक्तींना नौदलातर्फे श्रद्धांजली अर्पण करीत त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रति सहवेदना व्यक्त केल्यात. या दुर्दैवी अपघातात जखमी झालेल्यांची प्रकृती लवकर सुधारावी, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केलीय.

नौदलाकडून बचाव आणि शोध कार्य सुरूच : या दुर्घटनेप्रकरणी नौदलाकडून बचाव आणि शोध कार्य सुरू असल्याची माहिती नौदलाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कॅप्टन मेहूल कर्णिक यांनी दिलीय.
बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी नौदलाच्या आठ बोटी आणि हेलिकॉप्टरने बचाव कार्य करण्यात आलंय. दुर्घटना घडल्यानंतर पूर्ण रात्रभर बचाव आणि शोध कार्य सुरू होते.

ABOUT THE AUTHOR

...view details