महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 25, 2024, 9:14 PM IST

ETV Bharat / state

प्रभू श्रीरामांचा पदस्पर्श झालेल्या बाणगंगा तलावाच्या पायऱ्यांची नासधूस, कंत्राटदारावर गुन्हा दाखल - Banganga lake

Destroyed steps to Banganga lake : मुंबई महापालिकेचा ढीसाळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. 11व्या शतकातील ऐतिहासिक बाणगंगा तलावाचं काम करताना कंत्राटदाराकडून तलावच्या पायऱ्याची मोडतोड करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. त्यानंतर संबंधित ठेकेदारावर मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Destroyed steps to Banganga lake
बाणगंगा तलावाच्या पायऱ्यांची तोडफोड (Etv Bharat Reporter)

मुंबई Destroyed steps to Banganga Lake: दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर परिसरात असलेल्या ऐतिहासिक बाणगंगा तलाव राज्य-संरक्षित तलाव आहे. या तलावाच्या पुनर्विकासाचं काम सध्या सुरू आहे. मात्र काम करताना संबंधित ठेकेदाराकडून तलाच्या ऐतिहासिक पायऱ्यांची मोडतोड झाली आहे. याबाबत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागानं मुंबई महानगरपालिकेला कळवलंय. बाणगंगा तलावाची देखरेख करणाऱ्या GSB ट्रस्टनं देखील BMC विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर ठेकेदारावर मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तलावाच्या पायऱ्यांची मोडतोड : बाणगंगा तलावाच्या पुनर्विकासाचं काम सुरू असून, त्यातील पहिला टप्पा लवकरच पूर्ण होणार आहे. बाणगंगा तलाव परिसरातील 16 ऐतिहासिक दीपगृहांचंही पालिका नूतनीकरण करणार आहे. मात्र, बाणगंगा तलावाच्या पायऱ्या मोडतोड केल्यामुळं नवा वाद निर्माण झाला आहे. पालिकेच्या या कारवाईवर आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी आक्षेप घेतला आहे.

"बाणगंगा संपूर्ण भारतीयांसाठी एक ऐतिहासिक धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. प्रभू श्रीराम यांनी बाण मारून इथं तलाव निर्माण केलाय. याच तलावात प्रभू श्रीरामांनी आपले वडील राजा दशरथ यांचं पिंडदान केलं होतं. याच भागात प्रभू श्रीरामानं वाळू पासून एक शिवलिंग तयार केलं होतं. ज्याला आज आपण वाळकेश्वर म्हणतो. याच ऐतिहासिक वाळकेश्वर तलावावर आज बृहन्मुंबई महानगरपालिकेनं जेसीबी चालवला".- प्रीती शर्मा मेनन, आम आदमी पक्षा

मंत्री मंगल प्रभात लोढांवर कारवाई करा : " मुंबई महापालिका आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच देवेंद्र फडणवीस चालवत आहेत. कारण महापालिकेत लोकप्रतिनिधींची बॉडी नाहीय. महापालिका निवडणुका घेण्याची हिम्मत महायुती सरकारमध्ये नाही. भाजपानं हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या ऐतिहासिक बाणगंगा तलावावर जेसीबी चालवलाय. त्यामुळं मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे", अशी मागणी प्रीती शर्मा मेनन यांनी केली आहे.

रहिवाशांनीही बाणगंगा तलावाच्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केलीय. "बीएमसीनं पायऱ्यांवर रबरी फळी लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कोणतीही यंत्रसामग्री तलावात नेता येणार होती. मात्र, कोणत्याही अवजड यंत्रसामग्रीला तलावात प्रवेशाला परवानगी नव्हती. मी दुपारी 1 वाजता तिथं गेलो, तेव्हा जेसीबी चालकानं पायऱ्या उद्ध्वस्त केल्या होत्या" - आशिष त्रिवेदी, रहिवासी

ठेकेदारावर गुन्हा दाखल : या संदर्भात बोलताना मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, "मी सकाळीच बाणगंगा तलावाला भेट दिली. संबंधित भागाची पाहणी देखील केली आहे. यावर आम्ही कडक कारवाई करत असून संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात आलं आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता फणसळकर यांना देखील या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच संबंधित ठेकेदारावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे."

कंत्रदाराला कारणे दाखवा नोटीस : या संदर्भात पालिकेनं बाणगंगा प्रकल्पाचे कंत्राटदार मे. सावनी हेरिटेज कॉन्झर्व्हेशन प्रायव्हेट लिमिटेडला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसंच, मलबार हिल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक FIR-CR No.155/2024 Dt.25/06/2024 दाखल करण्यात आला आहे. यासोबतच खराब झालेल्या पायऱ्या दुरुस्त करण्याचं काम तातडीनं हाती घेण्यात आले असून पायऱ्या बदलण्याचं काम पूर्ण करण्यात आलं आहे. याप्रकरणी पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. तसंच, उर्वरित कामंही यापुढील काळात नियमितपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याचं पालिका प्रशासनानं सांगितलं.

बाणगंगा तलावाच पुनरुज्जीवन :यासंदर्भात राज्य शासन स्तरावर झालेल्या बैठकांनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून बाणगंगा तलावाचा पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प महापालिकेचा विशेष प्रकल्प म्हणून घोषित करून महापालिकेनं त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली होती. निविदा प्रक्रियेनंतर हेरिटेज कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली. मात्र, बाणगंगा तलावाचं काम सुरू असताना याच ठेकेदारानं तलावाच्या पायऱ्यांवर जेसीबी चालवल्यानं पालिकेची डोकेदुखी वाढलीय. पालिकेच्या माहितीनुसार, गाळ काढण्यासाठी मॅन्युअल यंत्रणा उभारून गाळ काढला जात होता.

'हे' वाचलंत का :

  1. विधान परिषद निवडणुकीत मविआला आणि महायुतीला मिळणार किती जागा? - Vidhan Parishad Election
  2. महायुतीत मिठाचा खडा, "अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावा", चंद्रकांत पाटलांवरील 'त्या' टीकेवरुन प्रवीण दरेकर संतापले - Pune FC Road Drug Case
  3. राज्याच्या अर्थसंकल्पात सत्ताधारी आमदारांना लागेल लॉटरी; समाजातील सर्व घटकांना खुश करण्याचा सरकारचा प्रयत्न - Mahayuti MLA Budget Demand

ABOUT THE AUTHOR

...view details