महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांबाबतचे 'हे' सर्वाधिकार देवेंद्र फडणवीसांकडं; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय कोणते? - DEVENDRA FADNAVIS ON CABINET

राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या निवडीच्या शिफारशींबाबतचे सर्वाधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं देण्यात आले. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले आहेत.

Devendra Fadnavis On Cabinet
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 16, 2025, 9:53 PM IST

मुंबई : मुंबईत बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यावरील हल्ल्यानंतर विरोधक-सत्ताधारी यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. दुसरीकडं आज (गुरुवारी) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्त पदासाठी नावाची शिफारस करण्याचा सर्वांधिकार मुख्यमंत्र्याकडं असणार आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मान्यता मिळाली. हा महत्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

पिंपळगावात शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय :या बैठकीत आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय सांगाव येथे होणार होते. तसा प्रस्ताव ही राज्य सरकारकडे होता. परंतु आता कागल ऐवजी अन्य ठिकाणी हे होमिओपॅथी कॉलेज होणार आहे. दरम्यान, आता हे कॉलेज पिंपळगाव खुर्द येथे होणार आहे. याबाबत आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. कागल तालुक्यातील सांगाव येथे नवीन शासकीय 100 विद्यार्थी क्षमतेचे होमिओपॅथी महाविद्यालय होणार होते. याबाबत 4 ऑक्टोबर 2024 च्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. मात्र तिथे पुरेशी जागा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे आता कागल सांगाव ऐवजी पिंपळगाव खुर्द येथे शासकीय महाविद्यालय होणार आहे. पिंपळगाव येथे 5 एकरपेक्षा अधिक गायरान जमीन उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारी सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या - मुख्यमंत्री :दुसरीकडे राज्यातील जास्तीत जास्त लोकांना सरकारी सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. त्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसीत करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या बैठकीत दिल्या. दरम्यान, विविध खात्याच्या ९६९ सेवा अधिसूचित करण्यात आल्या. त्यापैकी आपले सरकार पोर्टलवर ५३६ सेवा उपलब्ध आहेत. ९० सेवा विविध विभागांच्या पोर्टलवर उपलब्ध आहेत. मात्र ३४३ सेवा ऑफलाईन पद्धतीनं दिल्या जातात. मात्र या सर्वच सर्व सेवा आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

मार्गदर्शक सूचना जाहीर करा : एकीकडं राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तर दुसरीकडे शेतकऱ्यांबाबतही आगामी काळात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत. दरम्यान शेत वहीवाटीमध्ये वाहन वापरानुसार रस्ता करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करा. शासनानं शेत जमीन आणि रस्त्यांचे वर्गीकरण केले आहे. त्यानुसार शेत जमिनीमध्ये वहिवाट करण्यासाठी काही ठिकाणी अरुंद रस्ते आहेत. अशा ठिकाणी मोठी आणि जड वाहनं जाण्यास अडचण निर्माण होते. अरुंद शेतजमीन आणि रस्ते आहेत. तिथे शेत वहिवाटीमध्ये वाहन वापरानुसार रस्ता करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करा. शेत जमीन खरेदी-विक्रीबाबत महसूल विभागाची आज बैठक पार पडली. यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

हेही वाचा :

  1. पान‍िपतमध्ये शिवाजी महाराजांचा उभारणार पुतळा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
  2. 'केशव माधवामुळे मिळाला विजय'; महाराष्ट्रात वोट जिहादचा दुसरा पार्ट सुरू : देवेंद्र फडणवीसांची तुफान फटकेबाजी
  3. शक्तीपीठ महामार्गाचं काम जलदगतीनं सुरु करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; कसा आहे शक्तीपीठ महामार्ग ?

ABOUT THE AUTHOR

...view details