महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

ETV Bharat / state

अशीही 'पॅडगर्ल'; उच्चशिक्षित तरुणीने सुरू केली 'पीरियड जनजागृती मोहीम' - Periods Awareness

Period Awareness Campaign : 'मासिक पाळी' (Period) ही स्त्रियांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामुळं स्त्रीला मातृत्वाचा अनुभव घेता येतो. मात्र, आपल्याकडं याबाबत अनेक गैरसमज पूर्वीपासून पसरले आहेत. तर पुण्यातील 'अंजली दैने' (CA Anjali Daine) या उच्चशिक्षित तरुणीने मासिक पाळीबाबत असलेली अंधश्रद्धा दूर करण्याचं काम सुरू केलय.

Periods Awareness
मासिक पाळी जनजागृती (ETV Bharat Reporter)

पुणेPeriod Awareness Campaign: महिलांना आजही पुरुष प्रधान संस्कृतीत दुय्यम स्थान आहे. त्यात मासिक पाळीबद्दल अजूनही गैरसमज आहेत. शिवाय याचा परिणाम महिलांना भोगावा लागत आहे. आजही 'मासिक पाळी' (Period) म्हणजे विटाळ मानला जात आहे. या काळात महिलांना आधार दिला जात नाही. पण, पुण्यातील सीए असलेल्या 'अंजली दैने' (CA Anjali Daine) या तरुणीनं याबाबत जनजागृती सुरू केलीय.

मासिक पाळीबाबत अंधश्रद्धा : 21 व्या शतकात विज्ञान एवढं पुढे गेलं असतानाही समाजात अनेक अंधश्रद्धा आपल्याला पाहायला मिळतात. विशेष म्हणजे महिलांच्या बाबतीत म्हणायचं तर मासिक पाळीबाबत जनजागृती होत आहे. तरीही आजही महिलांमध्ये याबाबत अंधश्रद्धा पाहायला मिळते. हीच बाब आपल्या आजूबाजूला पाहायला मिळत असल्याचं लक्षात आल्यावर, पुण्यातील सीए 'अंजली दैने' या तरुणीने याबाबत जनजागृती सुरू केली. तिने अनेकांना मासिक पाळीबाबत असलेल्या अंधश्रद्धेतून बाहेर काढलं आहे.

प्रतिक्रिया देताना अंजली दैने (ETV Bharat Reporter)


मासिक पाळीबाबत जनजागृती: पुण्यातील सिंबोयासिस कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या आणि त्यांनतर सीए म्हणून काम करणाऱ्या अंजली दैने या तरुणीला घरात तसंच आजूबाजूला मासिक पाळीबाबत आजही अंधश्रद्धा पाहायला मिळाली. याबाबत तिने 'पीरियड जनजागृती मोहीम' हाती घेतली. पीरियड सोसायटी म्हणून तरुण-तरुणींची संघटना सुरू करून मासिक पाळी आणि आरोग्यविषयी जनजागृती करायला सुरूवात केली. तिने सोसायटी, रस्त्यावर, पालेभाज्या विकणाऱ्या महिलांमध्ये खुला संवाद साधला. तसंच वेगवेगळ्या शाळेत जाऊन मुलींशी संवाद साधून मासिक पाळीबाबत जनजागृती केली.

मी शिक्षण घेत असताना घरात तसेच आजूबाजूला आजही मासिक पाळीबाबत अंधश्रध्दा पाहायला मिळत होती. ती म्हणजे 'मासिक पाळी' सुरू असताना मंदिरात, स्वयंपाक घरात जावू नये, घरातील कामे करू नये. याबाबत आपल्याला जनजागृती केली पाहिजे म्हणून नेहमी डोक्यात विचार येत होता. मासिक पाळीबाबत अभ्यास केला आणि याबाबत जनजागृती करायला सुरूवात केली. - अंजली दैने,सीए

रस्त्यावर केली जनजागृती :पुण्यातील विविध चौकांमध्ये 'पीरियड जागरुकता मोहीम' आयोजित केली. ज्याचा उ‌द्देश आरोग्याविषयी जागरुकता वाढवणे होता. यावेळी रस्त्यांवर जनजागृती करत असताना प्रभावी स्लोगन आणि मासिक पाळीबाबत सकारात्मक पोस्टर्स तयार केले. रस्त्यावरच्या लोकांशी चर्चा केल्याचं अंजली सांगते.

मुलींशी साधला संवाद :पीरियड जागरुकता मोहिमेतील एक संवादात्मक घटक म्हणजे विविध मासिकपाळीची उत्पादने दाखवणे. ज्यामु‌ळं जिज्ञासा आणि शिक्षणाला चालना मिळाली. ही मोहीम सर्व वयोगटातील लोकांचं लक्ष वेधून घेत होती. एवढंच नव्हं तर 'पीरियड सोसायटी' म्हणून एक संघटना सुरू केली आणि या संघटनेच्या माध्यमातून विविध शाळेत जाऊन मुलींशी संवाद साधला. या मुलींना माहिती दिली की, मासिक पाळीत काय करावे आणि काय करू नये.

हेही वाचा -

  1. Menstrual Hygiene Day 2023 : या दिवशी मासिक पाळी स्वच्छता दिवस का साजरा केला जातो ? जाणून घ्या त्याचा उद्देश
  2. Menstrual cup : काय आहे मेन्स्ट्रूअल कप? स्त्रियांना माहित असणे आवश्यक...
  3. Mood Swings During Periods : पीरियड्समध्ये अशा प्रकारे होतो मूड स्विंग, जाणून घ्या यामागची कारणं

ABOUT THE AUTHOR

...view details