महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ब्राह्मण ही जात नव्हे तर संस्कृती; ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकरांचं मत - BRAHMIN COMMUNITY APPRECIATION

ब्राह्मण ही जात नाही तर संस्कृती आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हटल जातं, पण टिळक, सावरकर चिपळूणकरांचा महाराष्ट्र म्हटले जात नाही, असंही राहुल सोलापूरकर म्हणालेत.

Veteran actor Rahul Solapurkar
ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 22, 2024, 4:41 PM IST

पुणे :ब्राह्मण ही जात नाही तर संस्कृती आहे. चारित्र्यसंपन्नता हा ब्राह्मणांचा सगळ्यात मोठा गुण आहे, परंतु मागील 100 वर्षांत ब्राह्मण समाजाला आत्मविस्मृती आलीय. याचे सगळ्यांत मोठे कारण म्हणजे गांधी हत्येनंतरचा संहार आहे. त्यानंतर भय आणि नैराश्याने हा समाज पछाडला. ब्राह्मण समाज विखुरला गेला आणि एकत्र येण्याची प्रक्रिया खूप उशिरा सुरू झाली, असे मत ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेतर्फे 10 वे दैवज्ञ साहित्य संमेलनाचे उद्घाटन स्वारगेटजवळील गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

टिळक, सावरकर, चिपळूणकरांचा महाराष्ट्र म्हटले जात नाही : मुला-मुलींना शिकवा आणि परदेशी पाठवा हेच धोरण अवलंबिले गेले. फुले, शाहू, आंबेडकर यांचा महाराष्ट्र असे म्हटले जाते, परंतु टिळक, सावरकर, चिपळूणकर यांचा महाराष्ट्र म्हटले जात नाही, असंही ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी अधोरेखित केले. तसेच समाजश्रेष्ठी डॉ. गजानन रत्नपारखी, साहित्य संमेलनाध्यक्षा कृष्णी वाळके, अजय कारेकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात तीन पुस्तकांचे प्रकाशन झाले. यावेळी संदीप गजानन पावसकर यांना गडकरी प्रतिष्ठानच्या पुरस्काराने तर चंद्रशेखर दाभोळकरांचा नाथ माधव साहित्यिक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय.

ब्राह्मण समाजाचे इतर समाजाच्या उत्थानासाठी काम :यावेळी राहुल सोलापूरकर म्हणाले, ज्ञान संवर्धनात मोठेपणा मानणारा ब्राह्मण समाज आहे. ब्राह्मण समाजाने इतर समाजाच्या उत्थानासाठी काम केले. सगळ्या समाजाला एका स्तरावर आणून समाजाचा सांस्कृतिक स्तर उंचावण्याचे सर्वाधिक काम ब्राह्णणांनी केले, हे विस्मृतीत जाऊ नये, विश्वात्मक एकात्मता आणि संस्कृती च्या सगळ्या अंगाला समृद्ध करण्याचे काम ब्राह्मण समाजांना केले. आपापल्या क्षेत्रात दैवज्ञ आणि इतर ब्राह्मण समाजाने उंची गाठली आहे. समाजाचा इतिहास मोठा आहे, पण ते पुढच्या पिढीकडे सोपविणे देखील तितकेच महत्वाचे आहे, तरच समाज मोठा होतो, असंही यावेळी ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details