महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चार वर्षांच्या चिमुकल्याचा डबक्यात फेकल्यानं मृत्यू, अल्पवयीन मुलावर खुनाचा गुन्हा दाखल

Boy thrown in pond died : एक चार वर्षाचा बालक आपल्या सवंगड्यांसोबत खेळत असताना त्याला एका तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलानं उचलून डबक्यात फेकलं. या घटनेत बालकाचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव परिसरातील दातारनगर भागात मंगळवारी (5 मार्च) ही घटना घडली.

Malegaon Child Death Case
अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 7, 2024, 6:51 PM IST

Updated : Mar 7, 2024, 7:07 PM IST

चिमुकल्याला डबक्यात फेकताना अल्पवयीन मुलगा

नाशिकBoy thrown in pond died : लहान मुलांबरोबर खेळणाऱ्या एका चार वर्षाच्या मुलास एका अल्पवयीन मुलानं सांडपाण्याच्या डबक्यात फेकून दिलं. त्यानंतर ते पळून गेले. त्यातच बुडून या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना गेल्या मंगळवारी (5 मार्च) मालेगावमध्ये घडली. या प्रकरणी पवारवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मृतक बालक आपल्या आईसोबत आजीकडे आला होता.

छोट्या बालकाला डबक्यात फेकलं :मालेगाव परिसरातील दातारनगर भागात मंगळवारी (5 मार्च) घडलेल्या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे उघड झाला आहे. शहराच्या रमजानपुरा परिसरातील चार वर्षाचा मुलगा आईसोबत आजीच्या घरी दातारनगरमध्ये आला होता. लहान मुलांबरोबर खेळताना एका तेरा वर्षांच्या मुलानं त्याला उचलून एका डबक्याजवळ नेलं. यावेळी छोट्या बालकानं तिथून बाजूला होण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला; मात्र संशयित अल्पवयीन मुलानं त्याला उचलून थेट डबक्यात फेकून दिलं. त्यानंतर त्यासह इतर मुलं घटनास्थळावरून पळून गेली. यावेळी इतरही लहान मुलं त्या ठिकाणी खेळत होती. या घटनेमध्ये मुलाचा मृत्यू झाला आहे. या बाबत पवारवाडी पोलिसांनी संशयित अल्पवयीन मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं.


सीसीटीव्हीमुळे प्रकार उघड :दातारनगर भागातील डबक्यात लहान मुले मासे पकडण्यासाठी जात होती. चार वर्षीय बालक त्यांच्यासोबत गेल्यानं डबक्यात पडला असेल अशी शक्यता होती; मात्र कुटुंबातील सदस्यांनी शेजारील यंत्रमाग कारखान्याच्या सीसीटीव्हीची तपासणी केली असता हा प्रकार समोर आला. या चिमुकल्याला पाण्यात का फेकलं? याबाबत समजू शकलं नाही.

आम्हाला संशय होता : "चार वर्षीय बालकाच्या मृत्यूबाबत आम्हाला संशय होता. याची माहिती आम्ही धर्मगुरू हाजी यांना दिली. त्यांनी आजूबाजूचे कॅमेरे तपासण्यास सांगितलं. त्यानंतर घटनेच्या ठिकाणी असलेल्या एका यंत्रमाग कारखान्याच्या कॅमेऱ्यात आम्हाला घडलेला प्रकार दिसून आला. यात चिमुकल्याला एक तेरा ते चौदा वर्षांचा मुलगा पाण्यात फेकताना दिसतो. याची माहिती आम्ही पोलिसांना दिली असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत", असं मृतक बालकाच्या मामानं सांगितलं.



हेही वाचा:

  1. कोस्टल रोडचं 95 टक्के काम पूर्ण, लवकरच उद्घाटन होणार; कोस्टल रोडच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती
  2. ऑनलाइन जुगारवाल्यांकडून सरकारला हप्ता, संजय राऊतांचा गंभीर आरोप, महाविकास आघाडी मजबूत असल्याची दिली ग्वाही
  3. रशियात जाणाऱ्या मुलांचं केलं जातंय 'ब्रेन वॉश'? 'आमच्या मुलाला परत आणा', कुटुंबीयांची सरकारकडं मागणी
Last Updated : Mar 7, 2024, 7:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details