मुंबई High Court Summons to Naresh Mhaske :या मतदारसंघातील शिवसेना उबाठा पक्षाचे पराभूत उमेदवार राजन विचारे यांनी नरेश म्हस्के यांच्या विजयाला विरोध करत याचिका दाखल केली आहे. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रियाज छागला यांनी खासदार नरेश मस्के यांना समन्स बजावलं आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. नरेश मस्के यांना कनिष्ठ न्यायालयानं एका प्रकरणात दोषी ठरवल्याची बाब त्यांनी प्रतिज्ञापत्रकात लपवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे नरेश मस्के यांची खासदारकी रद्द करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयात 4 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे.
न्यायालयानं दोषी ठरवल्याची माहिती लपवली :राजन विचारे यांनी त्यांचे वकील दरियस खंबाटा यांच्यामार्फत उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली. राजन विचारे यांनी नरेश म्हस्के यांची खासदारकी रद्द करुन राजन विचारे यांना विजय घोषित करावं, अशी मागणी केली आहे. नरेश म्हस्के यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रकात त्यांच्याविरुद्ध कुठल्याही गुन्हामध्ये शिक्षा झाली नसल्याचं नमूद केलं आहे. मात्र त्यांना एका खटल्यात दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर ठाणे सत्र न्यायालयानं त्यांची अपील याचिका देखील फेटाळली. ही बाब नरेश मस्के यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात लपवली, असा आरोप राजन विचारे यांच्यातर्फे करण्यात आला आहे.