महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नितेश राणेंच्या 'हिंदू हुंकार दुचाकी' रॅलीला अमरावतीकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद - Nitesh Rane Visit Amravati

Nitesh Rane Visit Amravati : भाजपाचे नितेश राणे अमरावती दौऱ्यावर आहेत. परतवाडा आणि अचलपूर या दोन्ही शहरात आज रविवारी (29 सप्टेंबर) नितेश राणे यांच्या नेतृत्वात बाईक रॅलीत काढण्यात आली. हजारो युवक या रॅलीत सहभागी झाले.

Nitesh Rane Visit Amravati
नितेश राणेंच्या रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 29, 2024, 10:38 PM IST

अमरावती Nitesh Rane Visit Amravati :अमरावती जिल्ह्यातील अति संवेदनशील शहर अशी ओळख असणाऱ्या अचलपूर परतवाडा हे जुळं शहर आज 'जय श्री राम'च्या घोषणेनं दुमदुमलं. सकल हिंदू समाज आणि शक्ती फाउंडेशनच्या वतीनं रविवारी (29 सप्टेंबर) सायंकाळी चांदूरबाजार नाका परिसरातून अचलपुरात भाजपाचे नेते नितेश राणे यांच्या नेतृत्वात हजारो युवक 'हिंदू हुंकार बाईक' रॅलीत सहभागी झाले.

शहर बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त : सकल हिंदू समाज आणि शक्ती फाउंडेशनच्या वतीनं अचलपूर परतवाडा शहरात आज बाईक रॅली काढण्यासह सायंकाळी नितेश राणे यांची सभा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठ दिवसभर बंद होती. बाजारपेठ बंद असल्यामुळं सायंकाळी बाईक रॅलीत मोठ्या संख्येनं युवक येतील, असा अंदाज पोलिसांना आधीच होता. दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता म्हणून परतवाडा आणि अचलपूर या दोन्ही शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला.

नितेश राणेंच्या रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद (Source - ETV Bharat Reporter)

मिरवणुकीला रात्री उशीरा मिळाली परवानगी :सकल हिंदू समाज आणि शक्ती फाउंडेशनच्या वतीनं अचलपूर शहरातून बाईक रॅली काढण्यासंदर्भात पोलिसांनी शनिवारी दिवसभर खल घातला. रॅलीच्या मार्गात अंशतः बदल करून पोलिसांनी रात्री उशिरा रॅलीला परवानगी दिली. अचलपूर नाका, माळवेशपुरा गेट, जीवनपुरा, टक्कर चौक, तहसील रोड ,जयस्तंभ चौक, सदर बाजार, दुरानी चौक, भयानक चौक या मार्गानं निघालेली बाईक रॅली सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात पोहोचली.

हेही वाचा

  1. "विधानसभेत महाविकास आघाडीचा एन्काऊंटर..."; मुख्यमंत्र्यांचं विरोधकांवर टीकास्त्र - CM Eknath Shinde
  2. "एन्काऊंटर केलं, आता तुमचं राजकीय एन्काऊंटर होईल...", मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा - Manoj Jarange Patil On Amit Shah
  3. "काश्मीरच्या लाल चौकात मोदी-शाहांमुळं..."; 'या' आमदाराचा काँग्रेसवर हल्लाबोल - Prakash Awade On Congress

ABOUT THE AUTHOR

...view details