खिचडी घोटाळा प्रकरणी आमदार नितेश राणे खासदार संजय राऊतांवर टीका करताना मुंबईKhichdi Scam Case :भाजपा आमदार नितेश राणे यांनी आज (25 जानेवारी) मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी राऊत कुटुंबावर टीका केली. कोरोनाकाळात जी खिचडी गोर-गरीब लोकांसाठी बनवली होती. (Nitesh Rane On Sanjay Raut) त्यात तुम्ही घोटाळा केला, भ्रष्टाचार केला. गरिबांच्या तोंडची खिचडी पळवली आणि वरून दोन-चार लाखासाठी नोटीस पाठवली असं बोलता. केवळ राऊत कुटुंबालाच खिचडी बनवण्यासाठी दिली. महाराष्ट्रात खिचडी बनविण्यासाठी राऊत कुटुंबाशिवाय दुसरं कुठलं कुटुंब नव्हतं का? असा सवाल आमदार नितेश राणेंनी उपस्थित केला. गरीब, कामगारांची तुम्ही खिचडी खाल्ली आहे. ती तुम्हाला पचत नाही म्हणून आता तुमची चौकशी होत आहे. या कारणामुळे तुमचा थयथयाट होतोय, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी राऊत कुटुंबावर केला.
1 रुपयासुद्धा तुम्ही का खाल्ला?कोरोनाकाळात खिचडी गोर-गरिबांसाठी, कामगारांसाठी होती. ती तुम्ही खाल्ली आहे. ती तुम्हाला पचत नाही. अजीर्ण होत आहे. आता जेव्हा तुम्ही ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाल, तेव्हा ईडी कार्यालयातून बाहेर येणं पण तुमच्यासाठी कठीण होऊन बसेल आणि दोन-पाच लाखासाठी नोटीस का पाठवली? असं बोलताना संजय राऊतांना लाज वाटत नाही का? असं नितेश राणे म्हणाले. दोन-चार काय एक रुपयाही तुम्ही कामगारांचा का खाल्ला? करदात्यांचा पैसा का खाल्ला? शेवटी हा भ्रष्टाचार किंवा घोटाळा नाही का? अशी टीका नितेश राणेंनी राऊत कुटुंबावर केली.
खऱ्या अर्थानं राज्यात शिवशाही आली :संजय राऊत यांच्यासारखे मोघलांचे वंशज हिरवा साप बनून जे राज्यात वळवळ करत फिरत आहेत त्यांना आता ठेचण्याची योग्य वेळ आहे आणि ते ठेचण्याचं काम आमचं सरकार करेल, अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी संजय राऊतांवर केली. तसंच राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे खऱ्या अर्थानं शिवशाही आली आहे असंही आमदार नितेश राणे म्हणाले.
मग मविआ सरकारमध्ये आमच्यावर गुन्हे का -भाजपा ही ईडीची शाखा असून, भाजपाच्या सांगण्यावरूनच केंद्रीय तपास यंत्रणा काम करत आहेत. फक्त विरोधकांना त्रास देण्यासाठी विरोधकांवर गुन्हे दाखल केले जातात आणि चौकशी लावली जाते; मात्र भाजपातील एकाही नेत्याची चौकशी होत नाही किंवा गुन्हा दाखल होत नाही, असा आरोप संजय राऊत यांनी भाजपावर केला आहे. असा प्रश्न नितेश राणे यांना विचारला असता, मग मविआ सरकारच्या काळामध्ये भाजपा नेत्यांवर कारवाई आणि गुन्हे दाखल का होत होते? त्यावेळी सरकारमधील नेत्यांवर कारवाई का होत नव्हती? असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला.
हेही वाचा:
- आघाडीत बिघाडी, इंडिया आघाडी टिकवण्याचं नेत्यांपुढे आव्हान
- मनोज जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस; 'मुंबईतील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता'
- आम्हाला इंडिया आघाडी सोबत यायचंच आहे; पण आधी त्यांनी त्यांचं ठरवावं - वंचित बहुजन आघाडी