मुंबईBJP criticizes Sharad Pawar :यंदाच्या आषाढी वारीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, मी आषाढी वारी पायी चालणार नसल्याचं खुद्द शरद पवारांनी सांगितलं. त्यामुळं बातमी खोटी होती, असं त्यांनी स्पष्ट केलं. यावरुन आता भाजपानं शरद पवार यांच्यावर टीका केली. "शरद पवारांसारखे नास्तिक वारीत चालणार तरी कसे, हा प्रश्न वारकऱ्यांना यापूर्वीच पडला होता. शेवटी ही अफवाच निघाली," अशी टीका भाजपा आध्यात्मिक सेलचे अध्यक्ष, आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे.
स्वागतासाठी 'मी' उभा राहणार : शरद पवार यंदाच्या आषाढी वारीत बारामती ते इंदापूरमधील सणसपर्यंत पायी चालत वारीत सहभागी होणार, अशा बातम्या रंगल्या होत्या. पण मी वारीत सहभाग होणार नाही, असं शरद पवारांना वारीतील सहभागाबद्दल कधीच सांगितलं. मात्र, "वारी माझ्याच्या गावातून जाते, त्यामुळं शरद पवार सहभागी झाल्यास 'मी' त्यांच्या स्वागतासाठी उभा राहीन," असं आचार्य तुषार भोसले यांनी म्हटलं. मात्र, शरद पवारांनी मी वारीत चालणार नसल्याचं सांगितलंय. मी वारीत चालण्याच्या बातम्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पेरल्या गेल्याचं ते म्हणाले.