मुंबईDemanding Ban Free Ration :नुकत्याच झालेल्या 18 व्या लोकसभेसाठी देशभरात 7 टप्प्यात मतदान झालं. त्यानंतर देशात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले. मात्र, देशभरात मतदानाचा टक्का बराच घसरला आहे. महाराष्ट्रासह मुंबईतही अनेक ठिकाणी मतदानाचा टक्का घसरल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळं या सर्वांचा फटका महायुतीला बसला. महायुतीला बसलेल्या फटक्यामुळं व्यथित झालेल्या मुंबईतील भाजपा नेत्यानं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय. 'ज्या नागरिकांनी मतदान केलं नाही, त्यांना मोफत धान्य देऊ नका', अशी मागणी भाजपा नेत्यानं केली आहे.
'त्यांना' मोफत धान्य देऊ नका :लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासह मुंबईत झालेला पराभव भाजपा नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यातच मतदानाचा टक्का घसरल्यानं महायुतीला मोठा फटका बसलाय. म्हणूनच ज्यांनी मतदान केलं नाही, अशा नागरिकांना केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळणारं मोफत धान्य दिलं जाऊ नये, असं भाजपा नेत्याचं म्हणणं आहे. तसंच ज्यांनी मतदान केलं, त्यांनाच मोफत धान्य योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी देखील भाजपा नेत्यानं केली आहे. अर्जुन गुप्ता असं या भाजपा नेत्याचं नाव असून ते भाजपा उत्तर भारतीय मोर्चा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत.