ठाणे :लाडक्या बैलाने सलग 3 ते 4 तास हल्ला करत मालकाचा घेतला जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. मालकाचा जीव गेल्यानंतर बैलानेही प्राण सोडलेत. ही हृदयद्रावक घटना बदलापूरमधील वालीवली गावात घडलीय. याच गावात राहणाऱ्या विजय म्हात्रे यांना त्यांच्या बैलाने पहिल्यांदा ठार केले आणि काही तासांतच या बैलाचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण वालीवली गावात शोककळा पसरलीय.
म्हात्रे यांना बैलांच्या शर्यतीची खूप आवड :मिळालेल्या माहितीनुसार, मृत विजय म्हात्रे यांना कराटे आणि स्केटिंगची आवड होती. बदलापूर येथील एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून ते कार्यरत होते. मृत विजय म्हात्रे यांना बैलांच्या शर्यतीची खूप आवड होती. त्यासाठी त्यांनी तीन वर्षांपूर्वी हा बैल खरेदी केला होता. विजय म्हात्रे यांनी स्वतः बैलांच्या पाळण्याची आणि चारापाण्याची काळजी घेतली होती. शर्यतीचा बैल असल्याने त्याचा चारा चांगला आणि महाग होता. विजय म्हात्रे यांनी मोठ्या उत्साहाने त्याची काळजी घेतली होती. बैल चालवण्याचा आणि गाडी चालवण्याचा रोजचा सराव करीत होते.
विजय म्हात्रे हे घरापासून काही अंतरावर शेतात मृत :मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास विजय म्हात्रे हे त्यांचा बैल त्यांच्या घराजवळील गोठ्यात घेऊन गेले. त्यानंतर मात्र रात्री 8.30 वाजेपर्यंत विजय म्हात्रे घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांचा शोध सुरू केला. विजय म्हात्रे हे घरापासून काही अंतरावर शेतात मृतावस्थेत आढळले. त्यावरून बैलाच्या अंगावर झालेल्या जखमा आणि पोटात मोठी जखम झाल्याने विजय यांचा मृत्यू झाल्याचे समजले. या घटनेनंतर बदलापुरात शोककळा पसरलीय, याप्रकरणी स्थानिक बदलापूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केलाय.
हृदयद्रावक! लाडक्या बैलाने घेतला मालकाचा जीव; नंतर बैलानेही सोडले प्राण - BULL TOOK LIFE OWNER
गावात राहणाऱ्या विजय म्हात्रे यांना त्यांच्या बैलाने पहिल्यांदा ठार केले आणि काही तासांतच या बैलाचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण वालीवली गावात शोककळा पसरलीय.
लाडक्या बैलाने घेतला मालकाचा जीव (Source- ETV Bharat)
Published : Dec 19, 2024, 4:10 PM IST
|Updated : Dec 19, 2024, 5:44 PM IST
Last Updated : Dec 19, 2024, 5:44 PM IST