प्रतिक्रिया देताना सोने व्यावसायिक आकाश भंगाळे जळगावGOLD RATE IN INCREASE: सध्या लग्नसराईची काळ सुरू (Marriage Season) आहे. सोन्या-चांदीच्या दरात (Gold And Silver Price) सातत्यानं चढ-उतार होत असतानाच आजही सोन्याच्या दरात वाढ झालीय. 24 तासात सोन्याच्या भावात 1 हजार रुपयांची तर चांदीच्या भावातही 1 हजार रुपयांची वाढ झालीय. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्या चांदीच्या भावात वाढ कायम असून गेल्या 20 दिवसात सोन्याच्या भावात 4 हजार रुपयांची वाढ तर चांदीच्या भावात साडेचार हजार रुपयांची (Gold Silver Price Increased) विक्रमी वाढ झालीय.
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याचे भाव :जळगाव सुवर्णनगरीत आज सोन्याचे भाव 66 हजार 700 रुपयांवर (Jalgaon Gold News) तर चांदीचे भाव 76 हजार 500 रुपयांवर (Silver Price In Jalgaon) पोहचले आहे. अजूनही सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता सोने व्यापाऱ्यांनी व्यक्त केलीय. तर शहरात होळी पूर्वीच बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
लग्नसराईमुळंसोन्याची मागणी वाढली : गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र आहे. याचा मोठा फटका सोन्याची खरेदी करणाऱ्यांना बसत आहे. लग्नसराईमुळं मागणी वाढत असल्यानं सोन्याच्या भावानं आजपर्यंतचा नवा उच्चांक गाठलाय. सध्या लग्न सराईचा हंगाम सुरू आहे. या काळात लोक मोठ्या प्रमाणात सोने चांदी खरेदी करतात. पण सध्या सोने चांदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याचा मोठा फटका ग्राहकांना बसत आहे. त्यामुळं अनेक लोक सोने-चांदीची खरेदी करण्याकडं पाठ फिरवत आहेत. दरम्यान, येणाऱ्या काळात सोन्याच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता सोने व्यावसायिक आकाश भंगाळे यांनी व्यक्त केलीय.
हेही वाचा -
- 'डीआरआय'ने सोन्याच्या तस्करीचा केला पर्दाफाश, 16 किलो सोनं आणि दोन कोटी 65 लाख रोख रक्कम केली जप्त
- सोने तस्करीचं वाढलं प्रमाण, चारच दिवसांत विमानतळावरून तीन किलो सोनं जप्त
- चांदी शुद्ध करून देतो म्हणत व्यापाऱ्याची फसवणूक, कारखानदाराला अटक