महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मरळवाडीच्या सरपंचाची गोळ्या घालून हत्या; पोलीस घेताहेत मारेकऱ्यांचा शोध - Bapu Andhale Murder Case

Bapu Andhale Murder Case : जुन्या वादातून मरळवाडीच्या सरपंचाची हत्या करण्यात आली. बबन गिते, महादेव गिते यांच्यासह इतरांनी परळी शहरातील बँक कॉलनी भागात गोळीबार करत बापू आंधळे यांचा खून केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी गित्ते यांच्यावर 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bapu Andhale Murder Case
मृत सरपंच बापू आंधळे (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 30, 2024, 7:20 PM IST

बीडBapu Andhale Murder Case :राजकीय वैमनस्यातून मरळवाडी येथील सरपंच बापू आंधळे यांची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना काल (30 जून) रात्री घडली आहे. मृत सरपंच हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे कार्यकर्ते होते. तर त्यांच्यावर गोळीबार करणारे आरोपी बबन गिते आणि महादेव गिते हे राजकीय पदाधिकारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पथक त्यांचा शोध घेत आहे.

बापू आंधळे यांच्या हत्याकांडाविषयी माहिती देताना पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर (ETV Bharat Reporter)

अनेक वर्षांपासून दोन गटात भांडण :परळी तालुक्यातील मरळवाडी येथील सरपंच बापू आंधळे यांचे आणि बबन गिते यांचे जुने भांडण होते. पैशाच्या देवाणघेवाणीवरुन देखील या दोघात अनेकदा वाद झाले. दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर या दोघांमधील वाद अधिकच टोकाला गेला. लोकसभा निवडणुकीत बापू आंधळे हे धनंजय मुंडे यांच्या गटात असल्यानं गिते यांनी त्याला अनेकदा जाब विचारला होता. शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बँक कॉलनी भागात बबन गिते, महादेव गिते यांच्यासह इतरांनी बापू आणि त्याच्या काही सहकाऱ्यांना बोलावून घेत गोळ्या घातल्या. यामध्ये आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाला.

काल रात्री बॅंक कॉलनी परिसरात फायरिंगची घटना घडली. घटनेची पाहणी केली असता तिथं मृतदेह आणि काही साहित्य मिळालं. आमची टीम आरोपीला शोधण्यासाठी रवाना झाली आहे. या घटनेतील दोन जखमींना अंबेजोगाई इथं उपचारार्थ दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.- नंदकुमार ठाकूर, पोलीस अधीक्षक बीड

राजकीय वैर उठलं जीवावर :बबन गिते यांनी काही महिन्यांपूर्वी एका राजकीय पक्षात प्रवेश केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर त्यांच्यावर प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. गिते आणि धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते वाल्मिक कराड यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वैर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा:

  1. उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या चित्रामुळेच... देवेंद्र फडणवीसांना संजय राऊतांचं जोरदार प्रत्युत्तर - Sanjay Raut News
  2. विराटच्या डोळ्यात पाणी आल्यावर मुलगी वाल्मिकाला काय सांगितलं? अनुष्का शर्मानं शेअर केली पोस्ट - Anushka Sharma Shares post
  3. "अर्जुनाला जसा डोळा दिसत होता, तसं..." शरद पवारांचं निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य - SHARAD PAWAR News

ABOUT THE AUTHOR

...view details