महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महादेव बेटिंग ॲपचं बीड कनेक्शन; आरोपींकडून 150 एटीएम कार्ड, 67 बँक पासबुक आणि एवढे सिमकार्ड जप्त - Mahadev Betting App Exposed - MAHADEV BETTING APP EXPOSED

Mahadev Betting App Exposed : देशभर गाजणाऱ्या महादेव बेटिंग ॲप प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर आलं आहे. या ॲपवर बीडमधून चालवल्या जाणाऱ्या सट्ट्यावर सायबर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी एकाला ताब्यात घेण्यात आलं. यावेळी जप्त केलेले एटीएम कार्ड, बॅंक पासबुक, चेकबुक आणि सिमकार्ड पाहून पोलिसही थक्क झाले.

Mahadev Betting App Exposed
जप्त करण्यात आलेले सीमकार्ड, बॅंक पासबुक आणि मोबाईल (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 15, 2024, 5:10 PM IST

बीड Mahadev Betting App Exposed: महादेव बेटिंग ॲप प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडून विविध बँकांचे 150 एटीएम कार्ड, 67 बँक पासबुक, 100 चेकबुक आणि 25 सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात आणखी चार ते पाच जणांचा सहभाग असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत; मात्र हे रॅकेट मोठे असल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईविषयी बोलताना पोलीस अधिकारी (ETV Bharat Reporter)

आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी :महादेव बेटिंग ॲप प्रकरण देशभर गाजत आहे. या ॲपद्वारे बीड शहरातून सट्टा चालवला जात असल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली होती. शहरातील जालना रोडवरील एका अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये छापा टाकला. यावेळी रूपेश गंगाधर साखरे (ह.मु टेंभुर्णी, घाटशीळ पारगाव, ता. शिरूर) ही व्यक्ती महादेव ॲपवर ऑनलाइन सट्टा चालवत असल्याचं समोर आलं. त्याला अटक केली गेली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची कोठडी सुनावली.

आरोपी या प्रकारे घ्याचा पैसा :आरोपींकडून संबंधित बँक खात्याचे चेकबुक, एटीएम कार्ड हे आरोपींनी स्वतःकडे जमा करून घेत ऑनलाइन बॅंकिंग सोबत दुसरेच मोबाईल नंबर लिंक करून त्याचा गैरवापर केला. दरम्यान, या प्रकरणाची व्याप्ती आता बीडपर्यंत आल्याचं पहायला मिळत आहे. एका खात्यातून दुसरीकडे पैसे ट्रान्सफर करून रूपेश साखरे हा ऑनलाइन सट्टा खेळणाऱ्या ग्राहकांकडून फोन पे, गुगल पे, नेट बँकिंगद्वारे पैसे घेत होता आणि हे पैसे तो विविध बँक खात्यात ट्रान्सफर करत होता. त्यासाठी त्याच्याकडे 150 एटीएम, 67 पासबुक, 100 चेकबुक, 25 सिमकार्ड आढळून आले.

हेही वाचा:

  1. बॉलिवूड अभिनेता साहिल खानला 1 मेपर्यंत पोलीस कोठडी, काय आहे महादेव बेटिंग ॲप प्रकरण? - Mahadev Betting App Case
  2. महादेव बेटिंग ॲप प्रकरण; अभिनेता साहिल खानची एसआयटीकडून दोन तास चौकशी - Mahadev Betting App Case
  3. महादेव बेटिंग ॲपचं मुंबई कनेक्शन, एसआयटीने पहिल्या आरोपीला ठोकल्या बेड्या

ABOUT THE AUTHOR

...view details