महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे हिट अँड रन अपघात : 'त्या' अल्पवयीन आरोपीला न्यायालयानं 'या' अटींवर दिला जामीन - Pune Accident News

Pune Accident : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी त्या अल्पवयीन तरुणाला बाल न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. सतरा वर्षे अल्पवयीन तरुणानं भरधाव वेगानं गाडी चालवत दोन जणांचा जीव घेतला होता.

By ETV Bharat Marathi Team

Published : May 19, 2024, 10:00 PM IST

पुणे हिट अँड रन अपघातात 'त्या' अल्पवयीन आरोपीला न्यायालयानं 'या' अटींवर दिला जामीन
पुणे हिट अँड रन अपघातात 'त्या' अल्पवयीन आरोपीला न्यायालयानं 'या' अटींवर दिला जामीन (ETV Bharat Reporter)

प्रशांत पाटील आरोपीचे वकील (ETV Bharat Reporter)

पुणे Pune Accident : पुणे शहरातील कल्याणी नगर इथं एक धक्कादायक घटना घडली होती. शनिवारी मध्यरात्री कल्याणीनगर इथं पार्टी करुन जात असलेल्या तरुणानं भरधाव गाडीनं 2 जणांना चिरडलं असून यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. पुण्यातील या हिट अँड रन प्रकरणी "त्या" अल्पवयीन तरुणाला बाल न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. सतरा वर्षीय अल्पवयीन तरुणानं भरधाव वेगानं गाडी चालवत दोन जणांचा जीव घेतला. या अपघातात अनिस अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला.

अल्पवयीन आरोपीला 'या' अटींवर जामीन मंजूर : या प्रकरणात अल्पवयीन आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला बाल न्यायालयात दाखल केलं होतं. न्यायालयानं तो अल्पवयीन असून त्याच्यावर लावण्यात आलेलx कलम हे जामीन पात्र असल्यामुळं त्याला काही प्रमुख अटींवर जामीन मंजूर केला. अल्पवयीन आरोपीला पुढील पंधरा दिवस रस्त्यावर थांबून वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांसोबत वाहतुकीचं नियोजन करणं बंधनकारक असेल. तसंच अल्पवयीन तरुणाला मानसोपचार तज्ञांकडून समुपदेशन घ्यावं लागणार आहे. भविष्यात त्याच्या हातून कुठलाही अपघात घडला, तर अपघातग्रस्तांना मदत करावी लागणार आहे. अल्पवयीन तरुणाला डॉक्टरांकडं जाऊन दारु कशी सोडावी, याबद्दल धडे घ्यावे लागणार आहेत, या अटीवर त्याचा जामीन मंजूर करण्यात आलंय.

अपघातात दोघांचा मृत्यू : दरम्यान काल मध्यरात्री अल्पवयीन आरोपी हा हॉटेलमधून पार्टी करुन घरी परत जात होता. कल्याणीनगर-एअरपोर्ट रोडवर ग्रे कलरच्या दोन्ही बाजूस नंबरप्लेट नसलेल्या कारनं एका दुचाकीला (एम.एच. 14 सी क्यु 3622) पाठीमागून जोरात धडक दिली. यात त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता.

हेही वाचा :

  1. भरधाव वेगातील आलिशान कारची दुचाकीला धडक, पार्टीहून परतणाऱ्या तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू - Pune Accident
  2. तिहेरी अपघातात 1 जण ठार 3 जण गंभीर जखमी, तर बैलाचे मोडले पाय - Triple Accident In Beed
  3. चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट, एक किलोमीटरपर्यंत हादरे बसले! - Gas Tanker Explosion

ABOUT THE AUTHOR

...view details