आळंदी Dnyaneshwar Maharaj Palkhi :आषाढी वारीच्या सोहळ्याची सुरुवात 29 जूनला झाली होती. माऊलींच्या पादुका लाखो वारकऱ्यांच्या साक्षीनं आषाढी एकादशीला पंढरीत पोहचल्या. तिथं पांडुरंगाची भेट घेऊन पालखीचा परतीचा प्रवास सुरू झाला. पादुका आज अखेर अलंकापुरीत दाखल झाल्या आहेत. हजारो वारकरी भाविकांच्या उपस्थितीमध्ये हरिनाम गजरात सोहळा आळंदीत परतला. भाविकांनी मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत केलं. नगर प्रदक्षिणा झाल्यांतर पालखी मुख्य मंदिरात विसावली.
माऊली माऊली नाम जयघोषात पालखीचं स्वागत:आरती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांच्याद्वारे माऊलींच्या पादुकांची पुजा करण्यात आली. तर चोपदार बंधुंना श्रींची आरती करण्याचा मान मिळाला. पादुकांना तुळशीहार, पुष्पहार, श्रीफळ, पेढे प्रसाद वाहण्यात आला. याप्रसंगी पंचक्रोशीतून भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. माऊली-माऊली नाम जयघोषात पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यात आलं.
संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा अलंकापुरीत विसावला (ETV Bharat Reporter) श्रींच्या पादुका सुपूर्द:वारीवरून परतल्यानतंर श्रींच्या पादुका परंपरेनुसार आळंदी देवस्थानाकडे परंपरेनुसार सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप, पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, विश्वस्त भावार्थ देखणे, व्यवस्थापक माऊली वीर, चोपदार बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ रंधवे या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सत्कार ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी किसनराव लांडगे, हभप. गजानन महाराज सोनुने, हभप. राधाकृष्ण गरड, संचालक प्रवीण काळजे, हभप. रमेश घोंगडे आदी मान्यवर उपस्थित होते. दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी वारीच्या ठिकाणी तगडा बंदोबस्त तैनात केला. रोहिणी परुतगल्ले यांनी उत्कृष्ट रांगोळी काढली. यावेळी मंदिरात आकर्षक पुष्प सजावट केली होती. आळंदीतील स्वकाम सेवा, पोलीस मित्र यांनी सुरळीत दर्शन बारीचे नियोजन केले होते. यावेळी ट्रस्टच्या वतीने भाविकांना लापशीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. पालखीचं स्वागत करण्यासाठी भाविकांनी रस्त्याच्या कडेला गर्दी जमली होती. हरिनाम जयघोषात भावनकांनी वारीचं स्वागत केलं.
हेही वाचा
- आषाढी एकादशीच्या सोहळ्यास उत्साहात सुरुवात; विठूरायाच्या पंढरीत भाविकांची मांदियाळी - Ashadhi Wari 2024
- ‘याचि देही याचि डोळा'!; इंदापुरात पार पडले तुकाराम महाराजांच्या पालखीचे दुसरे रिंगण; पाहा गोल रिंगणाचे ड्रोन दृश्य - Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala