मुंबई Pm Modi In Anant Radhika Wedding : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री मुंबईत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या 'शुभ आशीर्वाद' सोहळ्यात हजेरी लावली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले. 'शुभ आशीर्वाद' सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये रात्री दाखल झाले. यावेळी त्यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांचा सहभाग होता.
अनंत - राधिकांनी घेतले पंतप्रधान मोदींचे आशीर्वाद :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मुंबईत भेट दिली. या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शुभ आशीर्वाद सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चरणस्पर्श करत त्यांचे आशीर्वाद घेतले. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्यात उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिडिओ सोशल माध्यमात शेयर केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी धार्मिक कार्यात सहभागी :मुंबईत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विवाह सोहळ्यातील धार्मिक सोहळ्याला उपस्थिती लावली. याबाबत ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी एक व्हिडिओ शेयर केला. या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या धार्मिक पूजेत सहभागी झाल्याचं दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विवाह सोहळ्यात उपस्थित असल्यानं मुकेश अंबानी त्यांच्याविषयी आदर व्यक्त करत असल्याचंही या व्हिडिओत स्पष्ट होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं विकासकामांचं लोकार्पण :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मुंबईत भेट दिली. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांची ही पहिलीच मुंबई भेट आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल 29 हजार 400 कोटी रुपयांच्या विकासकामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली. रस्ते, रेल्वे सेवा, बंदरं आदी अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडियन न्यूज पेपर सोसायटीच्या इमारतीचंही उद्घाटन केलं.
हेही वाचा :
- अनंत राधिकाच्या लग्नात दोन संशयितांची घुसखोरी; बीकेसी पोलिसांनी दाखल केले गुन्हे - Anant Radhika Wedding
- अंबानीच्या विवाहाचा बीकेसीतील कर्मचाऱ्यांना फटका, कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' - ANANT RADHIKA WEDDING
- अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा विवाह लावणाऱ्या पंडितानं घेतली 'इतकी' दक्षिणा - Anant Radhika Wedding