महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती विद्यापीठ कर्मचाऱ्यांची आईसह आत्महत्या; कारमध्ये सापडली 'सुसाईड नोट' - Amravati Suicide Case - AMRAVATI SUICIDE CASE

Amravati Suicide Case : अमरावती शहरात एक धक्कदायक घटना घडली आहे. अमरावती विद्यापीठातील (Amravati University) एका कनिष्ठ सहाय्यकांनी त्यांच्या वृद्ध आईसह तलावात उडी घेऊन आत्महत्या केली आहे.

Amravati Suicide Case
विद्यापीठ कर्मचाऱ्यांची आईसह आत्महत्या (ETV BHARAT Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 22, 2024, 10:48 PM IST

अमरावतीAmravatiSuicide Case: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात (Amravati University) कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या वृद्ध आईसह छत्री तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. घरगुती वादातून आई आणि मुलानं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज राजापेठ पोलिसांनी वर्तवला आहे. तर या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली. लक्ष्मण मनोहरराव लोणारकर (54) आणि लक्ष्मीबाई मनोहरराव लोणारकर (80) अशी मृत मुलगा आणि आईची नावं आहेत.




मृतदेह तलावात तरंगताना आढळला : छत्री तलाव लगतच असणाऱ्या दस्तूर नगर चौक येथील महारुद्र अपार्टमेंट येथील रहिवासी असणारे, लक्ष्मण लोणारकर आणि त्यांची आई लक्ष्मीबाई लोणारकर हे दोघेही शनिवारपासून घरून निघून गेले होते. रविवारी दुपारी लक्ष्मीबाई लोणारकर यांचा मृतदेह तलावाच्या पाण्यावर तरंगताना आढळला. त्यांचा मृतदेह पोलिसांच्या उपस्थितीत तलावातून बाहेर काढण्यात येत असतानाच काही अंतरावर लक्ष्मण लोणारकर यांचा मृतदेह देखील पाण्यात आढळला.

कारमध्ये सापडली सुसाईड नोट: छत्री तलावापासून काही अंतरावरच उभी असणाऱ्या लक्ष्मण लोणारकर यांच्या कारमध्ये 'सुसाईड नोट' पोलिसांना आढळली.' माझ्या आत्महत्येला कोणीही दोषी नाही मी स्वतः जबाबदार आहे." असा मजकूर सुसाईड नोटमध्ये लिहिला होता. राजापेठ पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

व्हाट्सअप्पमुळं ही आत्महत्या : याआधी ही अमरावतीत अशीच एक घटना घडली होती. 11 नोव्हेंबर 2023 रोजी माळेगाव शिवारात एका तरुणाने आत्महत्या केली होती. तर व्हाट्सअप्पमुळं ही आत्महत्या करण्यात आली होती. आरोपी हा मृतकाच्या पत्नीला मोबाइलवर कॉल करीत होता. या कारणावरुन मृतक आणि आरोपी यांच्यात 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास भांडण झालं होतं. त्यावेळी आरोपीने मृतकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली होती. त्यामुळं मृतक यांनी शेतात जाऊन आत्महत्या केली होती.

हेही वाचा -

  1. पती-पत्नीची मुलीसह आत्महत्या, कुटुंबाकडून कंपनीवर गंभीर आरोप - Nashik Suicide News
  2. लोक आत्महत्या का करतात? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत - Warning Sign Of Suicide
  3. आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व - World Suicide Prevention Day 2024

ABOUT THE AUTHOR

...view details