महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मनसेनं मतदार फोडण्यासाठी एवढे वर्ष सुपाऱ्याच घेतल्या, अंबादास दानवेंची राज ठाकरेंवर टीका - Ambadas Danve - AMBADAS DANVE

Ambadas Danve : राज ठाकरे यांच्या मनसेनं लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला होता. भाजपाने मनसेच्या पाठिंब्यावर महाराष्ट्रात मराठी मतदारांना फोडण्याचं काम केलं. मनेसेने मतदार फोडण्यासाठी एवढे वर्ष सुपाऱ्याच घेतल्या, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. सोबतच त्यांनी आताचे अनाजी पंत देवेंद्र फडणवीस आहेत, असंही सांगितलं.

Ambadas Danve
अंबादास दानवे आणि राज ठाकरे (Etv Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 26, 2024, 4:55 PM IST

छत्रपती संभाजीनगर Ambadas Danve:मनसेनं लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मनसेचा वापर भाजपानं मराठी मतदार फोडण्यासाठी केला आहे. त्यामुळे मराठी मतात फूट पाडण्याचं पाप मनसेनं आणि भाजपानं केलं. विधानसभा निवडणुकीत देखील त्यांचा हाच उद्देश दिसत आहे. लाडक्या बहीण, भाऊपेक्षा लाडक्या सुपाऱ्या जास्त प्रिय दिसतात. त्यांनी एवढ्या वर्षांत सुपाऱ्याच घेतल्या अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली. विधानसभा निवडणुकीत कोण किती जागा लढणार यापेक्षा किती लोक निवडून येणार हे महत्त्वाचं आहे, असं देखील दानवे यांनी सांगितलं.

अंबादास दानवेंची राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांवर टीका (Etv Bharat Reporter)


सत्ताधाऱ्यांनी आरक्षणाची भूमिका स्पष्ट करावी :विरोधकांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका घ्यावी असं सत्ताधारी सांगतात; मात्र सत्ताधाऱ्यांनी अंधारात आंदोलकांसोबत बैठक करायची आणि आम्हाला भूमिका स्पष्ट करा असं सांगायचं हे कसं चालेल. सत्ताधारी पक्षाने आधी त्यांची भूमिका जाहीर करावी. त्यानंतर आम्ही आमची भूमिका सांगू असं अंबादास दानवे यांनी सांगितलं. जरांगे पाटील भाजपा विरोधात विधानसभेत उतरणार असं म्हणतात. परंतु, निवडणूक अजून लांब आहे. कोणते पक्ष काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं आहे. म्हणून जरांगे यांच्या भूमिकेला लाख लाख शुभेच्छा आहेत, असं दानवे यांनी सांगितलं.


भाजपाला किंमत नाही :सिल्लोडमध्ये भाजपाच्या लोकांना कोणी विचारत नाही. रावसाहेब दानवे यांनी आरोप केला होता की, सिल्लोड पाकिस्तान होत आहे. तिथे भाजपाचे लोक रोज आंदोलन करतात आणि आरोप करतात. भाजपाच्या भूमिकेला कवडीची किंमत नाही, असा टोला यावेळी दानवे यांनी लगावला. पालकमंत्री म्हणून माझा अब्दुल सत्तार किंवा भुमरे यांच्याशी वैयक्तिक वाद नाही. सर्वांना समसमान निधी मिळावा अशी माझी अपेक्षा होती. विकास जनतेचा अधिकार असून त्यात तुम्ही राजकारण कसं करू शकता? यावरून माझा आणि भुमरे यांच्यात वाद झाला. सत्तार काही खूप नाही फक्त दोन महिन्यांचे पालकमंत्री आहेत. त्यांना खूप काम असतात. जिल्हाधिकाऱ्यांना दम देणे, जमिनी घेणे यात ते व्यस्त असतात. त्यामुळे त्यांना काम करायला वेळ मिळेल का? हे माहीत नाही, अशी टीका दानवे यांनी केली. मागच्या 25 वर्षांत मुंबईत पाऊस पडला की, शिवसेनेवर टीका होत होती. आता तिथे दोन वर्षांपासून शिवसेनेची सत्ता नाही. पुण्यात तर भाजपाची सत्ता आहे. पुण्यात मुलं पोहत आहे. उपमुख्यमंत्री वाररूममध्ये जाऊन पाहतात. याला फक्त सत्ताधारी जबाबदार आहे, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली.


फडणवीस अनाजी पंत :ठाकरे कुटुंबीयांवर भाजपा टीका करते; मात्र त्याच ठाकरेंमुळे भाजपा महाराष्ट्रात उभी राहिली. भाजपाला खेड्या-पाड्यात कोणी विचारत नव्हतं. ठाकरे पिता-पुत्रामुळे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. लोक अनाजी पंत बाबत बोलतात ते खोटं नाही. आताचे अनाजी पंत फडणवीस आहेत, असं म्हणत फडणवीसांवर अंबादास दानवे यांनी निशाणा साधला तर शिंदे दिल्लीत जाऊन काय काय करतील हे राज्यातील भाजपाच्या लोकांना कळणार नाही.

हेही वाचा:

  1. राज ठाकरे यांचं मत परिवर्तन होईल : मंत्री दीपक केसरकरांनी केला 'हा' दावा - Deepak Kesarkar On Raj Thackeray
  2. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात रात्री उशिरा ‘वर्षा’वर खलबतं: राजकीय चर्चांचा पाऊस? - Shinde Fadnavis Pawar Meeting
  3. "जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री", वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांचे लागले बॅनर - Uddhav Thackeray Banner

ABOUT THE AUTHOR

...view details