महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुरावे नष्ट होऊ नये म्हणून अक्षयचा मृतदेह पुरणार; पोलीसच घेणार जागेचा शोध - Akshay Shinde Encounter Case - AKSHAY SHINDE ENCOUNTER CASE

Akshay Shinde Encounter Case : बदलापूर येथील एका शाळेत झालेल्या दोन लहान मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा (Akshay Shinde) पोलिसांनी एन्काउंटर केला. दरम्यान या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. अक्षयच्या मृतदेहाचं दहन करणार नाही तर, त्याचा मृतदेह पुरण्यात येणार असल्याची माहिती, अक्षय शिंदेच्या वडिलांच्या वकिलांनी दिली.

Akshay Shinde
अक्षय शिंदे (file Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2024, 9:44 PM IST

ठाणेAkshay Shinde Encounter Case: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेतील अक्षय शिंदेचा (Akshay Shinde) मृत्यू पोलिसांच्या गोळीबारात झाला. त्यानंतर अक्षयच्या वडिलांनी न्यायालयात दाखल याचिकेत अक्षयला न्याय देण्यासाठी पुरावे नष्ट होऊ नये म्हणून मृतदेहावर अग्निसंस्कार न करता मृतदेह पुरून, भविष्यात पुरावे लागल्यास मृतदेह उकरता येईल अशी इच्छा सुनावणी दरम्यान व्यक्त केल्याची माहिती, वकील अमित कटारनवरे यांनी दिली. तर दुसरीकडं सीआयडी प्रमुख प्रशांत वाघुंडे यांनी टीमसह तब्बल साडेतीन तास ठिय्या मांडून प्रकरणाची माहिती घेऊन रवाना झाले. तर अक्षयचा मृतदेह पुरण्यासाठी जागेची उपलब्धता करून देण्याची याचना वडिलांनी केल्याची माहिती, वकील कटारनवरे यांनी दिली. तर आता अक्षयचा मृतदेह पुरण्यासाठी पोलीसच जागा शोधत आहेत अशी सूत्रांची माहिती आहे.


दफनविधीसाठी जागा उपलब्ध करावी: पोलीस चकमकीपूर्वी अक्षयची भेट आई आणि वडिलांनी तळोजा कारागृहात घेतली होती. तेव्हा अक्षयने त्याला जेलच्या बाहेर काढा, पैसे पाठवा, त्याला जेवयाला देत नाहीत, त्यानं काहीच केलं नाही असं सांगितलं होतं. त्यानंतर एका तासाने एसआयटी पथक ताबा घेण्यासाठी पोहचले आणि थेट अक्षय पोलीस चकमकीत ठार झाल्याची बातमी पसरली. अक्षयच्या वडिलांना मुलाच्या आक्रोशाची जाणीव झाली आणि त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. त्याच याचिकेवर न्यायालयात वकील अमित कटारनवरे युक्तिवाद करत आहेत. याचिकेत दफनविधीसाठी जागा ही पोलिसांनी पालिकेशी संपर्क साधून उपलब्ध करावी अशी मागणी केली. याबाबत सरकारी वकिलांनी पालिका संबंधितांशी चर्चा करून जागा मिळवून देण्याचा दिलासा दिल्याचं कटारनवरे यांनी सांगितलं.



साडेतीन तास मुंब्रा पोलीस ठाण्यात सीआयडीचा मुक्काम :अक्षय शिंदेच्या चकमकीनंतर पोलिसांची कारवाई आणि भूमिका संशयाच्या धुक्यात अडकली आहे. अन् सत्य शोधण्याचा प्रवास सुरू झाला. भर चौकात फाशी द्या म्हणणाऱ्यांनाही असा न्याय अपेक्षित नव्हता. न्यायालयात पुरावे, तक्रारदार, गुन्हा दाखल करण्यात कुणाचा दबाव, अशा विविध प्रश्नांची बरसात झाली असती आणि त्याची उत्तरेही पोलीस आणि शाळा व्यवस्थापनाला, संबंधित गुन्ह्यातील आरोपींना द्यावी लागली असती. परिणामी पोलीस चकमकीत अक्षयचा मृत्यू झाल्यानं या प्रकरणात जनमताचे दोन गट झाले. तसंच असंख्य प्रश्न उपस्थित झाले आहेत. चकमकीनंतर तिसऱ्या दिवशीच प्रकरणाचं गांभीर्य पाहून स्वतः सीआयडी प्रमुख प्रशांत वाघुंडे हे मुंब्रा पोलीस ठाण्यात साडेतीन तास ते चार तास ठाण मांडून बसले आणि सखोल चौकशी करत अनेक प्रश्नाची उत्तरे घेऊन पुन्हा कार्यालयाकडं रवाना झाले.


मृतदेह पुरण्यासाठी पोलीस शोधताहेत जागा? : न्यायालयात दाखल याचिकेमुळं न्यायालयानं आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्यासाठी सरकारी वकिलांनी दिलेल्या आश्वासनानंतर आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीसच अक्षयचा मृतदेह पुरण्यासाठी जागेचा शोध घेणार आहेत. दरम्यान, बदलापूरमध्ये मृतदेह पुरणे शक्य होणार नसून मृतदेह पुरण्यासाठी डोंबिवली किंवा अंबरनाथ येथे जागा शोधून मृतदेहावर दफनविधी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा -

  1. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी चौकशीचा ससेमिरा; पोलिसांची झाली अडचण - Akshay Shinde Encounter Case
  2. "अक्षय शिंदे एन्काऊंटर संपूर्णपणे फेक तसेच स्क्रिप्टेट; कोर्टात जाणार" - Akshay Shinde Encounter
  3. आरोपीच्या मृत्यूची निष्पक्षपणं चौकशी व्हावी, याला एन्काउण्टर कसं म्हणणार?- मुंबई उच्च न्यायालयाचं निरीक्षण - badlapur akshay shinde encounter

ABOUT THE AUTHOR

...view details