महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारामतीत आज धुमशान; अजित पवार आणि युगेंद्र पवारांनी भरला उमेदवारी अर्ज, काका पुतण्यांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

बारामती मतदार संघात काका विरुद्ध पुतण्या अशी लढत रंगणार आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे.

Maharashtra Assembly Election 2024
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2024, 6:37 AM IST

Updated : Oct 28, 2024, 12:37 PM IST

पुणे :राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदार संघात आज उपमुख्यमंत्री अजित पवार मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला आहे. तर दुसरीकडं शरद पवार यांच्या उपस्थितीत युगेंद्र पवार यांनी देखील आज आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. यामुळे बारामतीत पुन्हा एकदा काका-पुतण्या यांच्या लढाईत कोण बाजी मारणार हे पाहावं लागणार आहे. मात्र आज बारामती मतदार संघात मोठं 'धुमशान' पाहायला मिळत आहे.

बारामतीत पवार विरुद्ध पवार होणार लढत :बारामती विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार हेच उमेदवार असल्यानं बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे. लोकसभेत झालेल्या निवडणुकीत बारामतीच्या जनतेनं शरद पवारांना साथ दिली होती. आता बारामतीकर अजित पवार यांना साथ देणार की शरद पवार यांना साथ देणार हे पाहावं लागणार आहे.

बारामतीत आज धुमशान; अजित पवार आणि युगेंद्र पवार भरणार उमेदवारी अर्ज (Reporter)

बारामतीत पुन्हा काका पुतणे समोरासमोर :राष्ट्रवादी फुटीनंतर पवार कुटुंबात देखील फूट पडली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक 2024 मध्ये बारामतीची जनता शरद पवार यांच्यासोबत असल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडं अजित पवार यांच्यासोबत त्यांचं कुटुंब असल्याचं पाहायला मिळालं. गेल्या काही दिवसांपूर्वी तर अजित पवार हे बारामतीतून निवडणूक लढणार नसल्याची जोरदार चर्चा होती. पण आता अजित पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे बारामतीत पुन्हा काका पुतणे समोरासमोर आले असून यात कोण बाजी मारणार हे पाहावं लागणार आहे.

हेही वाचा :

  1. त्यांना आताच आमदारकीची स्वप्ने, अजित पवार यांचा युगेंद्र पवारांवर हल्ला - Ajit Pawar In Baramati
  2. राष्ट्रवादी शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवारांमध्ये फाईट, वाचा संपूर्ण यादी
  3. रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या जीविताला धोका, सुरक्षा द्यावी- सुप्रिया सुळेंचं पोलीस अधीक्षकांना पत्र - Supriya Sule writes letter to SP
Last Updated : Oct 28, 2024, 12:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details