पुणे : बारामती मतदार संघात आज काका विरुद्ध पुतण्यांचा जंगी सामना पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं युगेंद्र पवार हे देखील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र युगेंद्र पवार बारामतीत आल्यानंतर त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यासह छत्रपती शिवरायांना हार अर्पण केला. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच वादा अजित दादा अशी जोरदार घोषणाबाजी केली. सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांच्यासमोरच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं मोठी गोंधळ उडाला. त्यामुळे सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांचा चांगलाच गोंधळ उडाला.
'बारामतीत एकच वादा अजित दादा' ; कार्यकर्त्यांची युगेंद्र पवार, सुप्रिया सुळेंपुढं घोषणाबाजी - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
बारामती मतदार संघात आज काका पुतणे एकमेकांसमोर आले आहेत. युगेंद्र पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह बारामतीत पोहोचल्यानंतर त्यांच्यापुढंच कार्यकर्त्यांनी 'एकच वादा अजितदादा' अशी घोषणाबाजी केली.
Published : Oct 28, 2024, 11:16 AM IST
|Updated : Oct 28, 2024, 12:14 PM IST
सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी :बारामती मतदार संघात आज सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं युगेंद्र पवार आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर दुसरीकडं उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. युगेंद्र पवार आज सकाळी बारामती मतदार संघात पोहोचले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांच्या समोर जोरदार घोषणाबाजी केली. "एकच वादा अजित दादा" अशा जोरदार घोषणाबाजीनं परिसर दणाणून गेला. त्यामुळे सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांना काढता पाय घ्यावा लागला.
हेही वाचा :