पुणे Ajit Pawar Vidhan Sabha Election:पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात भाषण करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत घोषणा केली आहे. यावेळी आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे, शहराध्यक्ष दीपक मानकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रसंगी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याची घोषणा पवारांनी केली.
विरोधी पक्षात राहून विकास अशक्य - अजित पवार :अजित पवार म्हणाले की, आज पिंपरी चिंचवड, पुणे शहर आणि ग्रामीण असे मेळावे घ्यायचे होते; पण ग्रामीण भागातील मेळावा होऊ शकला नाही. आज जे सर्व गुरू आहे, त्या गुरूंना वंदन करतो. काही अफवा पसरवल्या जात आहे; पण अफवांवर विश्वास ठेवू नये. आज जो काही निर्णय घेतला आहे तो विकासासाठी घेतला आहे. विरोधी पक्षात राहून आंदोलन करून विकास होत नाही. तसेच प्रश्न सुटत नाही. आज पक्षातून काहीजण गेले. जे गेले आहे ते स्वतंत्र आहेत. आपल्याला पुणे शहरात जोमानं काम करावं लागणार आहे. वेळ फार कमी आहे. आपल्या सगळ्या नेत्यांनी निर्णय घेतला आणि इथपर्यंत पोहचलो आहे. एक असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, विधानसभा निवडणुका या ऑक्टोबरच्या शेवटापर्यंत किंवा नोव्हेंबरच्या पहिला आठवड्याला होणार आहे. तसेच पुण्यात राज्यातील सर्वांत मोठं एक दिवसीय शिबीर घ्यायचं आहे. त्याच बालेवाडी येथे बुकिंग करण्याचं कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.