मुंबई Mumbai Rain :मुंबईतील अनेक भागात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई तसेच उपनगरांत आज सकाळपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली. दरम्यान मुसळधार पावसामुळं मुंबईतील अनेत उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तर काही उड्डाणे शहरातील जवळच्या विमानतळांवर वळवण्यात आली. वाहतूक सेवेवरही याचा परिणाम जाणवत आहे. मुंबई लोकल काही मिनिटं उशिरानं धावत आहे.
एअर इंडिया देणार रिफंड :मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसामुळे उड्डाण सेवेवर परिणाम झाला आहे. पावसामुळे काही उड्डाणे रद्द तर काही उड्डाणे इतर ठिकाणी वळवण्यात आली आहेत. एअर इंडियाने प्रवासासाठी कन्फर्म झालेल्या बुकिंगसाठी पूर्ण परतावा किंवा एक वेळचं विनामूल्य रीशेड्युलिंग ऑफर देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एक लिंक शेअर करत लोकांना विमानतळावर जाण्यापूर्वी फ्लाइटची स्थिती तपासण्यास सांगितलं. एअर इंडियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिलीय.