महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

180 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात, थोडक्यात वाचले प्रवाशांचे प्राण - Pune Aircraft Accident

Pune Aircraft Accident : पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला 'पुश बॅक टग' वाहनाची धडक बसल्यानं मोठं नुकसान झालंय. विमानाला भगदाड पडल्याचं लक्षात येताच उड्डाण रद्द करण्यात आलं. त्यामुळं मोठा धोका टळला.

air india flight from pune collides with tug truck before takeoff
एअर इंडियाच्या विमानाचा अपघात (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 17, 2024, 12:55 PM IST

Updated : May 17, 2024, 1:13 PM IST

पुणे Pune Aircraft Accident :पुणे विमानतळावर गुरुवारी (16 मे) एअर इंडियाचं विमान धावपट्टीच्या दिशेनं जात असताना विमानाला 'पुश बॅक टग'ची टक्कर झाली. यावेळी विमानात सुमारे 180 प्रवासी होते.

यासंदर्भात अधिक माहिती देत पुणे विमानतळाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, "सुमारे 180 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा समोरील भाग आणि लँडिग गिअरजवळील टायरचं नुकसान झालं. विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. अपघातानंतर प्रवाशांना तात्काळ विमानातून उतरविण्यात आलं. त्यानंतर त्यांना दिल्ली जाण्यासाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली."

विमानाच्या किरकोळ अपघाताची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं गंभीर दखल घेतली आहे. विमानाची टग ट्रकला धडक कशी झाली?, याबाबत संबंधितांची चौकशी सुरू केली. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं (DGCA) टक्कर होण्याचं कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू केली आहे. तसंच असे अपघात टाळण्यासाठी डीजीसीएकडून उपाययोजना करण्यात येणार आहेत. अपघातानंतर विमानतळाचे कामकाज नियमितपणं सुरू होतं. त्यानंतर विमानाची तपासणी आणि दुरुस्त करण्यासाठी विमान उड्डाणाकरिता वापरण्यात आलं. अखेर हे विमान दुरुस्त करण्यात आलंय.

इंदिरा गांधी विमानतळाला उडविण्याची मिळाली होती धमकी-नुकतेच दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर दिल्ली-वडोदरा एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये विमानाच्या टॉयलेटमध्ये बॉम्ब हा शब्द लिहिलेला टिश्यू पेपर आढळला होता. क्रू मेंबरनं माहिती दिल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तपास केला. त्यानंतर हा खोडसाळपणा असल्याचं आढळून आलं. मात्र, पोलिसांनी खबरदारी म्हणून प्रवाशांना विमानातून खाली उतरवून विमानात तपासणी केली होती. यापूर्वी रविवारी ईमेलद्वारे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बनं उडविण्याची धमकी देण्यात आली होती. तीदेखील धमकी केवळ अफवा पसण्याचा हेतू असल्याचं सुरक्षा यंत्रणेला आढळून आलं.

हेही वाचा -

  1. अचानक विमान कर्मचारी सामूहिक रजेवर! एअर इंडिया एक्सप्रेसची विमान सेवा ठप्प - Air India Express
  2. मुंबई विमानतळावर व्हीलचेअरअभावी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; एअर इंडियाला तीस लाखांचा दंड
  3. उत्तर प्रदेशात धुक्याचं साम्राज्य; विमान उड्डाणास अडथळा, अनेक विमानं रद्द तर काही विमान उड्डाणाला उशीर
Last Updated : May 17, 2024, 1:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details