महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डोळ्यादेखत भावंड नदीपात्रात बुडताना माऊलीनं दाखविलं प्रसंगावधान, नेसलेली साडी सोडून दोघांना वाचविलं! - Ahmednagar Floods News - AHMEDNAGAR FLOODS NEWS

Ahmednagar Floods स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ताराबाई या महिलेने नदीपात्रात बुडणाऱ्या दोन तरुणांना जीवनदान दिलंय. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील कारवाडी हंडेवाडी येथे शुक्रवारी घडली. मात्र, तिसऱ्या तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. धैर्य आणि प्रसंगावधान राखून दोघांचे प्राण वाचविणाऱ्या महिलेला सन्मानित करण्यात यावे, अशी ग्रामस्थांनी मागणी केली.

Ahmednagar Floods
ताराबाई पवार आणि छबुराव पवार (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 28, 2024, 8:45 AM IST

Updated : Jul 28, 2024, 9:53 AM IST

अहमदनगर Ahmednagar Floods: मागील आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. संततधारेमुळे दारणा धरणातील पाणाच्या पातळीत वाढ झाली आहे. धरण ८० टक्के भरल्यानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. अशातच गोदावरी नदीपात्रात बुडत असलेल्या दोन तरुणांचा ताराबाई पवार या महिलेने जीव वाचवल्याची घटना पुढं आलीय. महिलेने जर धाडस केले तर काय होतं याचा प्रत्यय अहमदनगर जिल्ह्यातील कोरपगाव तालुक्यात आला आहे. ताराबाई यांनी अंगावरील साडी नदीपात्रात फेकून तरुणांचा जीव वाचवला.

सध्या, दारणा धरण क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे धरणाची पाणी पातळी वाढली. त्यामुळे गोदावरी नदीपात्रात हळूहळू विसर्ग वाढविण्यात आला. परिणामी नदीच्या काठावर असलेल्या विद्युत मोटारी सुरक्षित काढण्यासाठी शेतकऱ्यांना आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे. त्यामुळे नदीपात्रात दुर्घटना घडत आहेत.

नेमकं काय घडलं: कोपरगाव तालुक्यातील कारवाडी हंडेवाडी येथील रहिवासी तरुण शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोडे, प्रदीप भीमाशंकर तांगतोडे आणि अमोल भीमाशंकर तांगतोडे हे तीन भावंडं नदीतील सायपन आणि मोटारी काढण्यासाठी मंजूर येथील गोदावरी नदीपात्रात ऊतरले. तेव्हा अचानक पाणी वाढल्यानं तीनही तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले. सुदैवानं जवळच शेळ्या चारत असलेल्या ताराबाई पवार आणि छबुराव पवार यांनी ही घटना पाहिली. ताराबाई यांनी प्रसंगावधान राखत कोणताही विचार न करता तरुणांना वाचवण्यासाठी आपल्या अंगावरील साडीच्या आधारे वाचवण्यासाठी प्रयत्न केले. तर छबुराव पवार यांनीदेखील मदत केली. ताराबाईंच्या प्रयत्नांना यशदेखील आले. वाहून गेलेल्या दोघांना त्यांनी सुरक्षितपणे बाहेर काढलं.

तिसऱ्या तरुणाचा नदीपात्रातून काढला मृतदेह-ताराबाई यांच्या धाडसाचं सर्वस्तरातून कौतुक होत आहे. ताराबाई यांना शासनाकडून सन्मानित करण्यात यावे, अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे. बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी कोपरगावचे तहसीलदार संदीप कुमार भोसले यांनी आपली यंत्रणा कामाला लावली. संतोष भीमाशंकर तांगतोडे (वय 25) याचा मृतदेह शुक्रवारी बाहेर काढण्यात आला. ग्रामस्थांनी आणि कोपरगाव नगरपरिषदेचे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि जिगरबाज तरुणांनी बचावकार्यात अथक मेहनत घेतली.

महिलेने सांगितला थरारक अनुभव- ताराबाई पवार यांनी सांगितलं, "आम्ही जेवण करीत होतो. अचानक वाचवा, वाचवा, असा आवाज ऐकू आला. त्यामुळे आम्ही पळत सुटलो. तेव्हा तरुण पाण्यात बुडत होते. त्यांना वाचवण्यासाठी आम्ही त्यांच्यामागे पळत होतो. त्यावेळी आमच्याकडे काहीच साधन नव्हतं. पाणी किती कमी-जास्त आहे, हे कळत नव्हते. माझे मालकही पळत आले होते. मग मी साडी सोडून पाण्यात तरुणांकडे फेकली. त्यांना पाण्यातून बाहेर काढले. परंतु एका तरुणाचा आम्ही जीव वाचवू शकलो नाही. माझी मुले समजूनच साडी फेकून दिली. त्यांना वाचविणे माझे कर्तव्य आहे. मी म्हतारी महिला आहे. पण, त्यांचे आयुष्य अजून खूप पुढे आहे."

हेही वाचा

  1. कोल्हा'पूर' स्थिती गंभीर; पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ, 5 हजारांहून अधिक नागरिकांचं स्थलांतर - Kolhapur Flood Updates
  2. कोल्हापूरला महापुराचा धोका?; पंचगंगा धोका पातळीकडे मार्गक्रमण, राधानगरी धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडणार... - Kolhapur Rain Update
Last Updated : Jul 28, 2024, 9:53 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details