साताराActress Shweta Shinde :साताऱ्यातील पिरवाडीत राहणाऱ्या अभिनेत्री श्वेता शिंदे यांच्या बंगल्याच्या खिडकीचे गज कापून घरातील दागिने लंपास करणाऱ्या सराईत चोरट्यास सातारा स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. राजकुमार उर्फ राजू ओंकारप्पा आपचे (रा. कोथळी ता. उमरगा जि. धाराशिव), असं चोरट्याचं नाव आहे. त्याच्याकडून घरफोडीच्या तीन गुन्ह्यातील १३ लाख ३९ हजार रूपये किंमतीचे १८ तोळ्याचे दगिने जप्त करण्यात आले आहेत.
अभिनेत्रीच्या बंगल्यातील चोरीचा गुन्हा उघड : अभिनेत्री श्वेता शिंदे या आपल्या आईसोबत पिरवाडी (ता. सातारा) येथे राहतात. शुटींगच्या निमित्तानं आईसोबत त्या मुंबईला गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यानं त्यांच्या बंगल्याच्या खिडकीचे गज कापून कपाटातील ३ लाख 82 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिणे, रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा नोंद झाला होता. तसंच श्वेता शिदे यांनी पोलीस अधीक्षकाची भेट घेवून त्यांना घरफोडीची माहिती दिली होती.
खबऱ्याच्या माहितीवरून चोरट्याचं नाव निष्पन्न :पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, रोहित फार्णे, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील यांचे पथक तयार केलं होतं. तपासादरम्यान राजकुमार उर्फ राजू ओंकारप्पा आपचे यानं घरफोडी केली असल्याची माहिती खबऱ्यानं पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांना दिली.