शिर्डी Actress Jaya Prada In Shirdi : "'अब की बार चारसो पार' पंतप्रधान नरेंद्र मोदी ही एक गॅरंटी आहे. पंतप्रधान मोदी देशाला चांगल्या ठिकाणी घेवून जाणार आहेत. भाजपा परिवारात मी एक सदस्य म्हणून काम करते. पंतप्रधान मोदी जिथं राहतात, तिथं सगळं चांगलं होतं," असं म्हणत ज्येष्ठ अभिनेत्री तथा माजी खासदार जया प्रदा यांनी मोदींचं कौतुक केलं.
रामपूर हा माझा गड असल्याचं आझम खान यांनी म्हटलं होतं. यावर बोलतांना जया प्रदा म्हणाल्या की, "रामपूर हा जया प्रदाचा गड आहे. तसंच तो भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, योगी आदित्यनाथ यांचाही गड आहे. जनतेला मोदींच्या गॅरंटीवर भरोसा आहे. रामपूर लोकसभा मतदार संघात यावेळी भाजपाच जिंकणार आहे." ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा यांनी शिर्डीत साई बाबा यांचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी 'ईटीव्ही भारत'ला Exclusive प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्रातील जनता सदैव सुखी राहो : सुप्रसिद्ध अभिनेत्री तथा माजी खासदार जया प्रदा यांनी गुरुवारी रात्री आपला मुलगा सम्राटसह शिर्डीत येवून साई बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. दरम्यान, गुरुवार असल्यानं जया प्रदानं आपल्या मुलासह साई बाबांच्या रात्रीच्या आरतीला हजेरी लावली. "महाराष्ट्रातील जनता सदैव सुखी राहो, आनंदात राहो, साईबाबा सर्वांची इच्छा पूर्ण करो," अशी प्रार्थना साई बाबांच्या चरणी जया प्रदा यांनी केली.