शिर्डी : गेल्या अनेंक दिवसांपासून अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनिता आहुजा वेगवेगळे राहत असल्याची चर्चा सुरू होती. यावर सुनिता आहुजा यांनी 'ईटीव्ही भारत'ला Exclusive प्रतिक्रिया दिली. "आमची मुलगी मोठी झाली आहे. गोविंदा राजकारणात आल्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते सगळे घरी येत होते. त्यामुळं गोविंदानं आपलं ऑफिस बाहेर उघडलं. गोविंदा आणि मला या जगात कोणीच वेगळं करू शकत नाही. गोविंदा आणि मला वेगळं करणारं कोणी असेल तर त्यानं समोर यावं," अशी प्रतिक्रिया सुनिता आहुजा यांनी शिर्डीत दिली.
कोणीच वेगळं करू शकत नाही :अभिनेता गोविंदा यांच्या पत्नी सुनिता आहुजा यांनी रविवारी नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे जावून दर्शन घेतलं. त्यानंतर शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचं त्यांनी दर्शन घेतलं. साईबाबांच्या दर्शनानंतर 'ईटीव्ही भारत'बरोबर त्यांनी संवाद साधला. "मला आणि गोविंदाला या जगात कोणीच वेगळं करू शकत नाही. आम्हाला कोणी वेगळं करणारं असेल तर त्यानं समोर यावं," असं स्पष्ट सांगत गेल्या अनेक दिवसांपासून वेगळं राहत असल्याच्या चर्चांना पुर्णविराम दिला.