महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुय्यम निबंधकाच्या घरी लाचलुचपत विभागाला सापडली कोट्यवधींची माया

ACB Raids : सिल्लोड येथे लाथ लुचपत विभागाने पकडलेल्या दुय्यम निबंधकाच्या घरी झाडाझडती घेत असताना तब्बल 1 कोटी 35 लाखांची रोकड आढळून आली आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात माया कशी जमा केली याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

दुय्यम निबंधक छगन पाटील
दुय्यम निबंधक छगन पाटील

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 2, 2024, 10:51 PM IST

छत्रपती संभाजीनगर :ACB Raids : सिल्लोड येथे दुय्यम निबंधक छगन पाटील याला लाच लुचपत विभागाने 5 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडलं होतं. त्यानंतर शनिवारी दिवसभर त्याच्या घरी झाडाझडती घेत असताना, मोठ्या प्रमाणात बँकेचे खाते माहिती आणि इतर दस्तावेज आढळून आले आहेत. विशेष म्हणजे या निबंधकाला आज शुक्रवार (दि. 2 मार्च)रोजी सकाळीच निलंबित करण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. मात्र, ही कारवाई पूर्ण होण्याअगोदरच त्याला लाच घेताना रंगेहात पकडलं.

लाच घेताना झाली कारवाई : सिल्लोड येथील छगन पाटील या दुय्यम निबंधकाला शुक्रवारी लाचलुचपत विभागाने लाच घेताना रंगेहात अटक केली होती. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे सामूहिक जमीन होती. ती जमीन तक्रारदार पत्नीच्या नावे करण्यासाठी ते सिल्लोडच्या नोंदणी कार्यालयात गेले होते. त्यावेळी तिथे कार्यरत असलेले दुय्यम निबंध छगन पाटील यांनी त्यांना पैशांची मागणी केली. चर्चेअंती पाच हजार रुपये देऊन तडजोड ठरली. मात्र, तक्रारदाराला पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर सापळा रचून त्यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं.

घरी सापडले कोट्यवधी रुपये : लाचलुचपत विभागाने छगन पाटील यांच्यावर कारवाई केल्यानंतर आज शनिवारी छत्रपती संभाजीनगर शहरातील हिमायत बाग येथील त्यांच्या निवासस्थानी झाडाझडती घेतली. त्यात एक कोटी 35 लाखांची रोकड आढळून आली. तर त्याचबरोबर 28 तोळे सोनं, स्थावर मालमत्तेचे कागदपत्र, बँकांमधील मुदत ठेव प्रमाणपत्र आणि वाहन इत्यादी आढळून आलं. त्यावरून मिळालेला मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत विभागाने प्रसिध्दी पत्रक काढून दिली. विशेष म्हणजे सिल्लोड येथे उपनिबंधक कार्यालयात काम करत असताना तुकडा बंदी कायद्याचं उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात दस्तावेजांची हेरफेर त्यांनी केली होती आणि त्यातून शासनाची लाखो रुपयांची महसूल बुडालाचा ठपका त्यांच्यावर होता. या प्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश काढण्यात आले होते. मात्र, हे आदेश त्यांना मिळण्याआधीच त्यांच्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे. याप्रकरणी छगन पाटील याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details